Social Media Influencer Saam Tv
देश विदेश

IT Dept. On Social Media Influencer: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आयकर विभागाच्या रडारवर; अनेकांची चौकशी होणार?

Income Tax Department: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं उत्पन्न आणि नफा त्यांच्या यात फरक असल्याचं आयकर विभागाच्या लक्षात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स करणारे इन्फ्लुएन्सर्स अनेकदा लक्झरी कार, परदेशी लोकेशन, महागड्या वस्तूंसह व्हिडीओत दिसतात. इन्फ्लुएन्सर्सच्या अलिशान जीवनशैलीने अनेकजण चकीत होतात. या सोशल मीडिया स्टार्सकडे किती पैसा असेल असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल. आता हाच प्रश्न आयकर विभागालाही पडला आहे.

म्हणूनच सरकारने देशातील अनेक सोशल मीडिया स्टार्सकडे आपला मोर्चा वळवल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाने YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची चौकशी सुरू केली आहे. त्यांचे उत्पन्न आणि नफा यात फरक असल्याचं आयकर विभागाच्या निदर्शनात आलं आहे.

कमाई आणि टॅक्समध्ये फरक

केरळमधील जवळपास 10 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि त्या संबधित व्यक्तींवर माहितीच्या आधारे आयकर विभागाने कार्यवाही सुरु केली आहे. यात नवीन कलाकारांचा समावेश आहे. तसेच सोशल मीडियावर विविध कंपन्यांचं पैसे घेऊन ब्रँडिंग करणाऱ्या, पण कमी टॅक्स भरलेल्या इन्फ्लुएन्सर्सवरही आयकर विभागाची करडी नजर आहे. (Latest news Update)

टॅक्सचोरी प्रकरण

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स प्रमोशनद्वारे मोठी कमाई करत असल्याची माहिती आहे. मात्र तगडी कमाई करुनही अनेक जण टॅक्स भरतच नाहीत किंवा भरत आहेत ते खुप आहे. चौकशीनंतर अशा सर्वांना नोटीस पाठवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची उलाढाल 900 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. यात होत असलेली वाढ पाहता हा आकडा 2025 पर्यंत 2200 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

SCROLL FOR NEXT