Lion : जंगलाचा राजा सिंह 'या' ५ प्राण्यांना घाबरतो, समोर येताच घेतो माघार; कारण जाणून थक्क व्हाल

Shreya Maskar

जंगलाचा राजा

सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. त्याची ताकद, वेग, धारदार नखे आणि शक्तिशाली जबडा यामुळे जंगलातील अनेक प्राणी त्याला घाबरतात.

king of the jungle | pinterest

सिंह कोणत्या प्राण्यांना घाबरतो?

सिंह हा एक अत्यंत कुशल शिकारी आहे. मात्र, जंगलात असे काही प्राणी आहेत, ज्यांच्याशी सामना करणे सिंहालाही महागात पडू शकते. स्वतःला गंभीर दुखापत होऊ नये म्हणून सिंह अनेकदा अशा प्राण्यांपासून दूर राहणे पसंत करतो.

What animals is the lion afraid of? | pinterest

हत्ती

हत्ती हा आकाराने प्रचंड आणि ताकदवान प्राणी आहे. त्याचे वजन, लांब सोंड आणि मजबूत सुळे यामुळे तो सिंहासाठी धोकादायक ठरू शकतो. हत्तीला धोका जाणवल्यास तो आपल्या सोंडेने किंवा पायांनी सिंहावर हल्ला करू शकतो.

the elephant | pinterest

गेंडा

गेंड्याची जाड त्वचा, मजबूत शरीर आणि धारदार शिंग हे त्याचे प्रमुख संरक्षण आहे. गेंड्याला धोका जाणवल्यास तो वेगाने धाव घेत समोरच्या प्राण्यावर हल्ला करू शकतो.सिंहासाठी गेंड्याची शिकार करणे अत्यंत जोखमीचे असते.

rhinoceros | pinterest

पाणघोडा

पाणघोडा दिसायला शांत वाटत असला तरी तो अत्यंत शक्तिशाली आणि आक्रमक होऊ शकतो. त्याचे मोठे तोंड, मजबूत जबडे आणि लांब दात यामुळे तो समोरच्या प्राण्याला गंभीर दुखापत करू शकतो.विशेषतः पाण्याजवळ किंवा आपल्या क्षेत्रात दुसरा प्राणी आल्यास पाणघोडा आक्रमक होऊ शकतो.

hippopotamus | pinterest

रानम्हैस

रानम्हैस हा सिंहाच्या शिकारीतील एक महत्त्वाचा प्राणी असला तरी त्याच्याशी सामना करणे सोपे नसते. तिची मजबूत शरीरयष्टी, मोठी शिंगे आणि आक्रमक स्वभाव सिंहासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेष म्हणजे रानम्हशींचा कळप एकत्र येऊन सिंहावर प्रतिहल्ला करू शकतो.

wild buffalo | pinterest

तरस

सिंह आणि तरस यांच्यात जंगलात अन्न आणि क्षेत्रासाठी अनेकदा संघर्ष होतो. एकटा तरस निरोगी प्रौढ सिंहासाठी फारसा मोठा धोका नसतो. मात्र, तरसांचा मोठा समूह एकट्या सिंहाला घेरू शकतो.विशेषतः जखमी, अशक्त किंवा लहान सिंहांसाठी तरसांचा कळप धोकादायक ठरू शकतो.

taras | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : फक्त रात्रीच पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका, 'ही' असू शकतात ३ गंभीर कारणं

Night Leg Pain | AI PHOTO
येथे क्लिक करा...