Kangana Ranaut: कंगना रणौतच्या अडचणी वाढल्या, 'त्या' वादग्रस्त पोस्ट प्रकरणी FIR दाखल

Kangana Ranaut: सोनिया गांधी यांच्या पुस्तकानंतर कंगना रणौत यांनी गांधी कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे शिमल्यात एफआयआर दाखल झाला आहे. नेमकं प्रकरण काय आणि तक्रारीत कोणते आरोप करण्यात आले आहेत, जाणून घ्या.
Kangana Ranaut
Kangana RanautSaam Tv
Published On: 

Kangana Ranaut: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधणारी एक वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. मात्र, या पोस्टमधील विधानांमुळे आता कंगना रणौत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात हिमाचल प्रदेशातील शिमला येथे एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी व संजय गांधी यांच्या मृत्यूबाबत या पोस्टमध्ये प्रक्षोभक विधाने करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

शिमलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या प्रकरणाची माहिती दिली. शिमल्यातील रहिवासी कॅप्टन अतुल शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १९६, ३५३ आणि ३५६ अंतर्गत कंगना रणौत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Kangana Ranaut
Tinu Anand Health Update: ५ बरगड्या फ्रॅक्चर, फुफ्फुसाला दुखापत; ज्येष्ठ अभिनेते रुग्णालायात दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

नेमकं काय आहे तक्रारीत?

कॅप्टन अतुल शर्मा यांच्या आरोपानुसार, १० नोव्हेंबर रोजी कंगना रणौत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूशी संबंधित अत्यंत प्रक्षोभक विधाने करण्यात आली होती. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि विविध गटांमध्ये शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. पोलीस महासंचालकांना ईमेलद्वारे पाठवलेल्या तक्रारीत कॅप्टन शर्मा यांनी कंगना यांच्याविरोधात तातडीने एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच या पोस्टची सायबर-फॉरेन्सिक तपासणी ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्याची विनंतीही करण्यात आली होती. गुरुवारी रात्री ७ वाजून ५१ मिनिटांनी ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

Kangana Ranaut
Govinda: 'प्यार करते हैं और करते रहेंगे...'; गोविंदासोबत रानी स्वर्णकारचे रोमँटिक फोटो व्हायरल

सोनिया गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त दावे

या पोस्टमध्ये सोनिया गांधी यांच्याबाबतही आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, त्यांचे वर्णन 'रहस्यमय परदेशी नागरिक' असे करण्यात आले होते. तसेच गांधी कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूच्या घटनांदरम्यान त्या परदेशातील एका कॅफेमध्ये उपस्थित असल्याचा दावा करण्यात आल्याचे म्हटले आहे. याशिवाय, संजय गांधी यांच्या निधनानंतर मनेका गांधी यांना अचानक कुटुंबाच्या निवासस्थानातून बाहेर काढण्यात आल्याचा उल्लेखही पोस्टमध्ये असल्याचे तक्रारदाराने सांगितले. अशा प्रकारची कथने खोटी असून, त्यातून समाजात भीती आणि सार्वजनिक अशांतता निर्माण होऊ शकते, असा आरोप कॅप्टन शर्मा यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून तक्रारीची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.