Govinda: 'प्यार करते हैं और करते रहेंगे...'; गोविंदासोबत रानी स्वर्णकारचे रोमँटिक फोटो व्हायरल

Govinda: गोविंदा सात वर्षांनंतर 'रूपा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. राणी स्वर्णकारसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले असून सुनीता आहुजासोबतच्या नात्याचीही चर्चा रंगली आहे.
Govinda
GovindaSaam Tv
Published On: 

Govinda: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे पत्नी सुनीता आहुजासोबतच्या नात्यातील मतभेदांमुळे तो चर्चेत असताना, दुसरीकडे तब्बल सात वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. गोविंदा 'रूपा' (Roopa) या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राणी स्वर्णकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील गोविंदा आणि राणीचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून, त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

गोविंदा आणि राणीचे रोमँटिक फोटो व्हायरल

गोविंदाने काही दिवसांपूर्वी राणी स्वर्णकारची 'रूपा' चित्रपटातील नायिका म्हणून ओळख करून दिली होती. आता राणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गोविंदासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. राणीने जांभळ्या रंगाची सुंदर साडी, मोत्यांचा हार आणि खास हेअरस्टाइल केली आहे. तर गोविंदा पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये दिसत आहे. दोघेही एकमेकांच्या जवळ उभे राहून खास पोज देताना दिसतात. हे फोटो शेअर करताना राणीने 'रूपा' चित्रपटातील सुंदर झलक असे कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे, तिने या पोस्टसोबत प्यार का ज़माना कभी होगा न पुराण, प्यार करते है करते रहेंगे हे रोमँटिक गाणेही जोडले आहे.

Govinda
Death News: ज्येष्ठ अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते काळाच्या पडद्याआड

राणी स्वर्णकारचा पहिलाच चित्रपट

विशेष म्हणजे, 'रूपा' हा राणी स्वर्णकारचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. गोविंदासारख्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तिची विशेष चर्चा होत आहे. दुसरीकडे, सात वर्षांच्या विश्रांतीनंतर गोविंदा मोठ्या पडद्यावर परतणार असल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.

Govinda
Bigg Boss 20: लव गिलसोबतच्या वादानंतर स्काउट ओपीने केलं टक्कल; ढसाढसा रडताना दिसला, नेमकं काय घडलं?

गोविंदा आणि राणीच्या नात्याबद्दल चर्चा

गोविंदा आणि राणी अनेकदा एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिनेही याप्रकरणी काही गंभीर आरोप केले होते. मात्र, गोविंदाने राणीसोबतच्या अफेअरच्या चर्चा फेटाळून लावत त्यांचे नाते व्यावसायिक असल्याचे स्पष्ट केले होते. राणीनेही सोशल मीडियावर सुनीताबाबत प्रतिक्रिया दिली होती.

सुनीता आणि गोविंदाच्या नात्याचीही चर्चा

गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक आयुष्यातील तणावाची गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. सुनीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्तही समोर आले होते. मात्र, नंतर तिने तो मागे घेतल्याचे सांगितले जाते. अलीकडे दोघेही एकत्र कमी दिसत असले तरी 'लॉक अप २' या शोमध्ये ते एकत्र दिसले होते. आता गोविंदाच्या 'रूपा' चित्रपटातील रोमँटिक फोटोंमुळे पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.