Death News: ज्येष्ठ अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते काळाच्या पडद्याआड

Death News: ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचे पती आणि चित्रपट निर्माते जयंत मुखर्जी यांचे निधन झाले. वयाच्या १५ व्या वर्षी झालेले लग्न, चित्रपट कारकीर्द आणि कौटुंबिक आयुष्य जाणून घ्या.
actress moushumi chatterjee husband producer jayanta mukherjee passes away
actress moushumi chatterjee husband producer jayanta mukherjee passes awaySaam Tv
Published On: 

Death News: बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचे पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते जयंत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयंत मुखर्जी यांचे वयोमानामुळे होणाऱ्या आजारांमुळे निधन झाले. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कुटुंबीयांच्या उपस्थितीत घेतला अखेरचा श्वास

बी. एन. तिवारी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, जयंत मुखर्जी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच मौसमी चॅटर्जी यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

actress moushumi chatterjee husband producer jayanta mukherjee passes away
Bigg Boss 20: लव गिलसोबतच्या वादानंतर स्काउट ओपीने केलं टक्कल; ढसाढसा रडताना दिसला, नेमकं काय घडलं?

अनेक प्रसिद्ध चित्रपटांची केली निर्मिती

जयंत मुखर्जी हे केवळ मौसमी चॅटर्जी यांचे पती नव्हते, तर चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध निर्माते होते. त्यांनी 'मजाक', 'दो लडके दोनो कडके' आणि 'बीवी और मकान' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे, यातील 'मजाक' आणि 'दो लडके दोनो कडके' या चित्रपटांमध्ये मौसमी चॅटर्जी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय १९९२ मध्ये आलेल्या 'तलाश' या टीव्ही शोच्या निर्मितीमध्येही त्यांचा सहभाग होता.जयंत मुखर्जी यांचे संगीत क्षेत्राशीही जवळचे नाते होते. ते प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांचे पुत्र होते. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी पुढे नेला. 'बीवी और मकान' या चित्रपटाच्या संगीतासाठीही त्यांनी काम केले होते.

actress moushumi chatterjee husband producer jayanta mukherjee passes away
OTT Releases: शुक्रवारी OTT आणि थिएटरमध्ये मनोरंजनाची मेजवानी; 'दायरा'पासून 'रणबाली'पर्यंत 8 चित्रपट आणि वेब सीरिज होणार रिलीज

वयाच्या १५ व्या वर्षी मौसमी चॅटर्जी यांनी केले होते लग्न

मौसमी चॅटर्जी आणि जयंत मुखर्जी यांची प्रेमकहाणीही विशेष चर्चेत राहिली होती. १९७२ मध्ये दोघांचे लग्न झाले. त्यावेळी मौसमी केवळ १५ वर्षांच्या होत्या आणि दहावीत शिकत होत्या. वृत्तांनुसार, आपल्या मावशीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतक्या कमी वयात लग्न केले होते.लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपते, असा त्या काळातील समज मौसमी यांनी चुकीचा ठरवला. त्यांनी ७० आणि ८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या जोडप्याला पायल आणि मेघा अशा दोन मुली आहेत. जवळपास ५४ वर्षांचा संसार केल्यानंतर जयंत मुखर्जी यांच्या निधनामुळे मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.