Imran Khan Saam TV
देश विदेश

पाकिस्तानच्या PM पदावरून पायउतार झाल्यावर इम्रान खान यांची मोठी घोषणा

दरम्यान काही खासदारांनी राजीनामा द्यायला सुरुवात देखील केली आहे.

वृत्तसंस्था

इस्लामाबाद - पंतप्रधानपदावरून पायउतार झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत येणारच नाही, अशी घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान तहरिके इन्साफ या पक्षासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. तसंच पीटीआयचे सर्व खासदार एकत्रितपणे राजीनामा देतील, असा निर्णय या बैठकीत झाला असल्याचं बोललं जातयं. दरम्यान काही खासदारांनी राजीनामा द्यायला सुरुवात देखील केली आहे.

हे देखील पहा -

जिओ न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिली की, इम्रान खान यांनी लष्करावर आणि सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्यासाठी संसदेत कोणत्याही परिस्थितीत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. तसंच पीटीआयचे खासदार पाकिस्तानला लुटणाऱ्या चोरांसोबत बसणार नाहीत, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. अनेक खासदारांनी इम्रान यांच्या राजीनाम्याला विरोध केला आहे.

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार

शनिवारी रात्री उशीरा नॅशनल असेंब्लींमध्ये अविश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यामुळे इम्रान खान यांची सत्ता गेली. त्यानंतर विरोधी पक्षनेता शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) या पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ आणि पाकिस्तान तहरिके इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषीत केले. दरम्यान, अविश्वास ठरावाद्वारे सत्ता गमवावी लागलेले इम्रान खान पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान ठरले. या पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ यांनी दिलेली प्रतिक्रिया अशी की, पाकिस्तानमध्ये येणारे नवीन सरकार सुडाचे राजकारण करणार नाही, पाकिस्तानचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. मला भूतकाळातील कटुता नको आहे, सूड घेणे, लोकांना विनाकारण तुरुंगात डांबणे असे सुडाचे राजकारण आम्हाला करायचे नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT