Chicken And Fish Price Hike Saam Tv
देश विदेश

Chicken And Fish Price Hike: नॉनव्हेज लव्हर्सला झटका! मासे आणि चिकनच्या दरात वाढ, जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार

Chicken And Fish Price: मासे आणि चिकनच्या दरामध्ये किती रुपयांनी (Chicken And Fish Price Hike) वाढ झाली आहे वाचा सविस्तर....

Priya More

Non Veg Lovers: वाढत्या महागाईमुळे (Inflation) त्रस्त असलेल्या जनतेच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे. चिकन, अंडी आणि मासे खाणाऱ्या नॉनव्हेज लव्हर्सला याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. कारण मासे आणि चिकनच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे चिकन आणि मासे खाणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मासे आणि चिकनच्या दरामध्ये किती रुपयांनी (Chicken And Fish Price Hike) वाढ झाली आहे ते आपण पाहणार आहोत...

म्हणून झाली माशांच्या दरात वाढ -

पावसाळ्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी आणि किनारपट्टीवर परतू लागल्या आहेत. त्यामुळे मागणीच्या तुलनेत माशांची आवक कमी झाली. त्यामुळेच माशांच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. माशांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे आता मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

चिकनसाठी इतके पैसे मोजावे लागणार -

माशांपाठोपाठ आता चिकनचे दर देखील वाढले आहेत. चिकनच्या दरामध्ये प्रतिकिलो मागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तर अंड्यांचे दर देखील वाढले आहेत. अंड्याचे दर 35 रुपयांनी वाढले आहेत. सध्या मार्केटमध्ये चिकन 260 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. चिकनचे दर हे फक्त राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यातली ही मोठी वाढ असल्याचे सांगितले जात आहे.

म्हणून चिकनचे दर वाढले -

कोंबड्यांची आवक घटल्यामुळे चिकनचे दर वाढले असल्याचे सांगितले जात आहे. कोंबड्यांची आवक घटण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अति उष्णतेमुळे कोंबड्या मरुन पडत आहेत. त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांचे नुकसान होत आहे. येत्या काळामध्ये चिकन आणि माशांच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिकन आणि माशांच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्य जनता आणि खवय्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT