
Mumbai News: एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) कोसळत आहे. काही भागातील जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे. तर दुसरीकडे केरळमध्ये मान्सूनचे आगमन उशीरा होणार आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अशामध्ये आता अरबी समुद्रात (Arabian Sea) नवं चक्रीवादळ तयार होत असल्याची माहिती समोर आली आहे.
हवामान खात्याने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात (Cyclone) रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात 5 जून रोजी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढच्या 48 तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरील चक्रीवादळासाठी महारागरातील स्थिती अनुकूल आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ जर तयार झाले तर त्याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हवामान खाते याकडे लक्ष ठेवून आहे.
अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकण्याची प्राथमिकता आहे. परिणामी या चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागामध्ये वेगाने वारे वाहतील. तसंच, या चक्रीवादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पाऊस पडेल आणि मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, यंदा मान्सून (Monsoon 2023) लांबला आहे. मान्सून लांबल्यामुळे त्याची केरळमध्ये (Monsoon In Kerala) दाखल होण्याची तारीख देखील पुढे ढकलली गेली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. मान्सून केरळमध्ये रविवारी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण तो अंदाज चूकला कारण मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झाला नाही. मान्सून केरळमध्ये उशिराने दाखल होणार असल्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिराने दाखल होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.