महाराष्ट्रातील विविध भागात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्याचदरम्यान हवामान विभागाने उद्यासाठी म्हणजेच रविवार १८ ऑक्टोबरसाठी नवा हवामान अंदाज वर्तवलाय. महाराष्ट्रासह १० राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
१८ ऑक्टोबर रोजी देशाच्या दक्षिण भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी किमान १० राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
यासह पुद्दुचेरी, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे आणि इतर केंद्रशासित प्रदेशांमध्येही पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, गोवा आणि मराठवाडा या भागांत जोरदार वाऱ्यांसह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आलीय. या आठवड्यात वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतात हवामानात कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता नाही.
१८ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशमधील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम किंवा पूर्व उत्तर प्रदेशमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात आलंय. परिणामी, राज्यात पावसाबाबत किंवा वादळाबाबत कोणताच इशारा देण्यात आला नाहीये. जरी उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशच्या वातावरणाच्या खालच्या थरांमध्ये एक 'सायक्लोनिक सर्क्युलेशन' (चक्रीवादळसदृश स्थिती) दिसून येत असले, तरी १८ ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीये.
रविवारी बिहारमध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात बिहारसाठी पाऊस, वादळ किंवा जोरदार वाऱ्यांबाबत कोणतीही विशेष चेतावणी देण्यात आलेली नाहीये.
या पार्श्वभूमीवर, सध्या संपूर्ण राज्यात हवामानात कोणतेही मोठे बदल होण्याची चिन्हे नाहीत. दिवसाच्या किंवा रात्रीच्या तापमानात कोणतीही लक्षणीय घट किंवा वाढ होणार नाहीये. त्यामुळे, थंडी वाढत आहे किंवा एखाद्या विशिष्ट जिल्ह्यात तापमान कमी होत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
१८ ऑक्टोबर रोजी दिल्लीत आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाने आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, कमाल तापमान ३१° ते ३३°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान १८ ते २०°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा १.६° ते ३°C ने कमी राहू शकते, तर किमान तापमान सामान्य श्रेणीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी पूर्वेकडून १५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. दुपारी २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
राज्यस्थामध्ये रविवारी पाऊस होईल असा अंदाज आहे. राज्यातील पूर्वेकडील भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर पश्चिम राजस्थानमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. उद्या म्हणजे रविवारी पूर्व भागात पाऊस होईल असा अंदाज आहे. तर १९ ऑक्टोबरपासून राज्यातील दोन्ही हवामान उपविभागांमध्ये पावसाची शक्यता नाहीये. उद्या राजस्थानमध्ये जोरदार वादळी पाऊस किंवा वेगवान वारे वाहण्याबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचीही शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पुढील ५ दिवस ही परिस्थिती राहू शकते, असे हवामान विभागाने म्हटलंय. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आजपासून पुढील ३ दिवस विजा, मेघगर्जना आणि सुसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.