Dark storm clouds gather as strong winds and heavy rain sweep across multiple regions in India following IMD alert. saam tv
देश विदेश

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

IMD Weather Alert For Heavy Rain In India June 2026: भारतीय हवामान विभागाने देशभरात वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. 1 ते 6 जून दरम्यान अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे.

Omkar Sonawane

भारतीय हवामान विभागाने (IMD) आताच दिलेल्या माहितीनुसार, देशात या आठवड्यात पुन्हा वादळी हवामानाची शक्यता आहे. ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील काही भागांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसासह वादळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. IMD च्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये ताशी 70 किमी वेगाने वारे वाहू शकतात. यासोबतच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. 1 जून ते 6 जून दरम्यान पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि झारखंड आणि ओडीशामध्ये हलका ते मध्यम पाऊस, वादळी वादळी वारे पावसाचा अंदाज आहे.

देशभरात अनेक हवामान प्रणाली सक्रिय

सध्या देशभरात विविध हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय असल्यामुळे वातावरणात मोठे बदल दिसत आहेत. उत्तर पश्चिम, उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात 3.1 ते 7.6 किमी उंचीवर पश्चिमी वारे सक्रिय आहे. यामुळे हिमालयीन राज्ये, उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाऊस, वादळे आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पाकिस्तान आणि राजस्थानच्या भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

ईशान्य भारत आणि दक्षिण आसाममध्ये देखील वादळी वारे तयार झाले असून, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार आणि ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य भारतातील दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशातही वातावरण तयार झाले असून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पाऊस आणि वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पूर्व विदर्भापासून दक्षिण केरळपर्यंत कमी दाबाची रेषा पसरली असून, अरबी समुद्रातून ओलावा खेचला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनच्या पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील एक-दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT