IMD rainfall alert in tamil nadu kerala uttarakhand Maharashtra Weather Updates  Saam TV
देश विदेश

IMD Rain Alert: हवेतील गारवा वाढल्याने वातावरणात मोठा बदल; येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Weather Updates: पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारवा वाढला आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून येत्या ४८ तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

गेल्या आठवडाभरापासून देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. काही शहरांमध्ये उन्हाच्या झळा, तर काही ठिकाणी थंडीची चाहूल सुद्धा जाणवत आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारवा वाढला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून येत्या ४८ तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

देशातून मान्सून पूर्णपणे परतला असला, तरी अजूनही तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत अंदमान-निकोबार बेट, केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.

पुढील ७ दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हलक्या (Rain News) ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा इशारा IMD कडून देण्यात आला आहे.

स्कायमेट हवामान अहवालानुसार, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, किनारी कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाचा अंदाज (Rain Alert) वर्तवण्यात आला आहे.

छत्तीसगड आणि ओडिशामधील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम हिमालयात 3 नोव्हेंबरपर्यंत हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. गोवा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी लागलर आहे.

या सोबतच केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT