वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार सुरू असताना ऑट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू मिचेल मार्श अनिश्चित काळासाठी वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मार्श गुरुवारी भारतातून मायदेशी परतला असून उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या सहभागाबाबत निश्चितता नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिचेल मार्श हा संघात कधी पुनरागमन करणार? याबाबतची टाइमलाइन निश्चित केली जाणार आहे. सध्या तरी याबाबत अजून कुठलाही निर्णय झाला नसून लवकरच याची पुष्टी केली जाणार असल्याचंऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना इंग्लंड संघासोबत होणार आहे. अव्वल चारमध्ये कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यातच मिचेल मार्श या महत्वाच्या सामन्यापूर्वी अचानक मायदेशी परतल्याने ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मिचेल मार्श विश्वचषक २०२३ स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने ६ सामन्यात ३७.५० च्या सरासरीने आणि ९१.४६ च्या स्ट्राईक रेटने २२५ धावा केल्या आहेत. याशिवाय मार्शने २ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
शानदार लयीत असलेला अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल देखील गोल्फ खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. कार्टमधून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याच्या डोक्याला जबर इजा झाली आहे. त्यामुळे सोमवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या इंग्लंडविरोधातील सामन्याला तो मुकणार आहे.
मॅक्सवेलला 6 ते 8 दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कर्णधार पॅट कमिन्सचं टेन्शन वाढलं आहे. मॅक्सवेलची जागा कुणीही घेऊ शकत नाही, आम्हाला त्याची कमतरता जाणवेल. तो लवकरात लवकर बरा व्हावा, असं ऑस्ट्रेलियन संघाने म्हटलं आहे.
इंग्लंडविरोधातील सामन्यासाठी मॅक्सवेल उपलब्ध नसेल. आम्हाला संघात काही पर्याय आहेत. मार्कस स्टॉयनिस, कॅमेरॉन ग्रीन असे काही खेळाडू उपलब्ध आहेत, पण आम्ही अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही, असंही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.