Rain Alert in Maharashtra saam tv
देश विदेश

IMD Rain Alert : सावधान! पुढील ७ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

IMD alert for next 7 days : महाराष्ट्रासह देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा तडाखा पुढील ७ दिवसही कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील कोकणसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील ७ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

भारतीय हवामान खात्यानं पुढील सात दिवसांसाठी देशभरातील विविध राज्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांत थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर पुढील सात दिवसही कायम राहणार आहे.

महाराष्ट्रातील कोकण, गोवा आदी भाग आणि गुजरातमध्ये पुढील ७ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात २७ जून ते ३ जुलै या कालावधीत विविध भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह ढगांचा कडकडाट आणि विजाही चमकतील, असा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये १ ते ३ जुलै या काळात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तामिळनाडू, कर्नाटकाचा किनारी भाग, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये २७ जून ते ३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

केरळमध्ये २७ आणि २८ जून रोजी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि तेलंगणात २७ ते ३० जूनपर्यंत ४० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. ईशान्येकडील राज्यांमध्ये बहुतांश भागांत पुढील सात दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. या दरम्यान विविध ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस कोसळेल.

हिमाचल प्रदेशात पूरस्थिती, बचावकार्य सुरू

हिमाचल प्रदेशातील कांगला आणि कुल्लू जिल्ह्यांत बुधवारी ढगफुटी झाली. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. सहा जण वाहून गेले असून ते बेपत्ता आहेत. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथके, पोलीस आणि होमगार्ड यांच्या पथकांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. कुल्लू जिल्ह्यातील रेहला बिहालमध्ये ढगफुटी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. यात तीन जण वाहून गेले. त्यांचाही शोध सुरू आहे.

दिल्लीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

दिल्लीत आज, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, शहरात सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान २९ अंश सेल्सियस इतके नोंदले गेले. तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस इतके राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card KYC: रेशन कार्ड केवायसी कसं करायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत घ्या जाणून

Sindhudurg : आनंदाची बातमी! नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला; पाहा VIDEO

Sangli : विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण; पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी, शिंदेसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Live News Update: छावाचे विजय घाडगे मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीचे सुरज चव्हाणसह 10 आरोपी अटक

Butter Chicken Recipe: गटारीनिमित्त घरीच बनवा 'बटर चिकन' ; वाचा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT