Heavy Rain Alert: महाराष्ट्रासह २६ राज्यांना अतिवृष्टीचा धडकी भरवणारा इशारा, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Heavy Rain Alert: हवामान विभागाने २६ राज्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पूर आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Rain Alert
Rain AlertSaam TV News
Published On

भारतीय हवामान विभागाने देशभरातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे होणाऱ्या संभाव्य पुराबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने शनिवारी महाराष्ट्रासह २६ राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसानं अनेक राज्यांना झोडपून काढलं आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट, अरूणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, गोवा, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल आहे.

Rain Alert
Akola Crime: ऑटो रिक्षाचा दुचाकीला धक्का अन् रात्रीच राडा, धारदार शस्त्राने वार करत एकाला संपवलं

अतिवृष्टीमुळे होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आयएमडीने दिले आहेत. रहिवाशांना घरातच राहण्याचा, पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असुरक्षित भागात भूस्खलन आणि अचानक पूर येण्याचा इशाराही आयएमडीने दिला आहे. दरम्यान, उत्तर भारतात मान्सूनच्या आगमनाने बऱ्याच काळापासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या राज्यांनाही दिलासा मिळाला आहे.

Rain Alert
Akola Crime: ऑटो रिक्षाचा दुचाकीला धक्का अन् रात्रीच राडा, धारदार शस्त्राने वार करत एकाला संपवलं

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील पुणे, रायगड, सातारा, नाशिक, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसासोबत जोरदार वारे, धुळीचे वादळ, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com