IMD Alert : सतर्क राहा! पुढील ७ दिवस देशात पाऊस घालणार धुमाकूळ; महाराष्ट्रातील कोकण, विदर्भालाही अलर्ट

IMD predicts heavy rainfall : भारतीय हवामान खात्यानं महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भासह देशभरातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. पुढील ७ दिवस हवामानाचा अंदाज काय असेल हे पाहूयात.
देशभरात पुढील ७ दिवस मुसळधार, हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट
IMD Rain Alertsaam tv
Published On

महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतील काही जिल्ह्यांसाठी पुढील ७ दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत. २५ जूनपासून काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन देखील केलं आहे.

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम भारतात (वायव्येकडील राज्ये) बुधवार, २५ जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत पावसाचा जोर अधिक वाढू शकतो, असंही त्यात म्हटलं आहे.

येत्या सात दिवसांत मध्य, पूर्व आणि इशान्य भारतातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात पुढील २४ तासांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. तत्पूर्वी हवामान खात्याकडून राजधानी दिल्लीत सोमवारी दिवसभर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यांसह ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळेल; तसेच संध्याकाळी ते रात्रीच्या सुमारास ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस दिल्लीत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत आज सोमवारी किमान तापमान २८.४ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सियसपर्यंत राहील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील ५ दिवस या राज्यांमध्ये पावसाचा जोर

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, २३ ते २७ जून या कालावधीत मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगडमधील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

२५ आणि २६ जून या दोन दिवसांत महाराष्ट्रातील विदर्भात, २४ ते २७ जून या कालावधीत पश्चिम बंगाल आणि सिक्किम, २३ आणि २४ जून रोजी बिहारमध्ये, २६ जून रोजी झारखंडमध्ये, २५ आणि २६ जून रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पाऊस कधी आणि कुठे?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटावर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, तसेच ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. बहुतांश ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ ते २७ जून या कालावधीत जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, पंजाब, हरयाणामधील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. याच कालावधीत देशाची राजधानी दिल्लीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशभरात पुढील ७ दिवस मुसळधार, हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट
Maharashtra Weather : कोकणात मुसळधार, पुण्यात धो धो पावसाचा इशारा, IMD चा डबल अलर्ट

२३ ते २९ जून या कालावधीत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भाग, राजस्थानच्या पूर्वेकडील भाग, २४ ते २५ जून या कालावधीत राजस्थानच्या पश्चिमेकडील भाग, २३, २४ जून आणि २८ आणि २९ जून रोजी उत्तर प्रदेशचा पूर्वेकडील भाग, २३ ते २७ जून दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, २३ आणि २४ जून रोजी राजस्थानचा पूर्वेकडील भाग, २५ आणि २६ जून रोजी हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील भाग, २५ जून रोजी जम्मू-काश्मीर, लडाख आदी भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

देशभरात पुढील ७ दिवस मुसळधार, हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट
Rain Alert : धुळे जिल्ह्यात आज यलो अलर्ट; या भागात राहणार अधिक जोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com