IMD WEATHER ALERT: HEAVY RAIN, THUNDERSTORMS AND STRONG WINDS ACROSS INDIA saam tv
देश विदेश

विजांचा कडकडाट, वादळी वारे अन् मुसळधार पाऊस! सोमवारी हवामानाचा धक्कादायक इशारा

IMD Heavy Rainfall And Thunderstorm Forecast For Monday In India: देशातील अनेक भागांत सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

देशातील अनेक भागांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व, ईशान्य आणि पश्चिम तसेच उपसागरात काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील काही भागांमध्ये जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे.

सोमवारी हवामान विभागाचा अंदाज काय?

नागालँड, माणिपूर, मिझोरम, त्रिपुरा हिमालयातील काही भाग, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसहगढ, कर्नाटक, गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून हरियाणा आणि पंजाबमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. या भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादमध्ये वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे, तर उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर व दक्षिण अंतर्गत कर्नाटकात ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहत 70 किमी प्रतितास वेगाने झोत येण्याची शक्यता असून ‘थंडरस्क्वॉल’चा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT