यंदाही गणेशोत्सवात कोकणवासीयांचे हाल, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai-Goa Highway: यंदाही गणेशोत्सवात गावी जाताना कोकणवासीयांना तारेवरची कसरत करावी लागलीय.. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडीनं प्रवाशांचे कसे हाल झाले ? पाहूयात या रिपोर्टमधून...
GANESHOTSAV TRAFFIC CHAOS
GANESHOTSAV TRAFFIC CHAOSsaam tv
Published On

विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी निघालेल्या कोकणवासीयांच्या नशिबी गणेशोत्सवात पुन्हा एकदा विघ्नच आली...रस्त्यावरच खड्ड्याचं साम्राज्य, प्रचंड वाहतुक कोंडी, रेल्वेत होणारी गर्दी आणि 8 तासांच्या प्रवासाला 12 तासांपेक्षा जास्त वेळ घालवत कोकणवासी पुन्हा एकदा कोकणच्या दिशेने रवाना झाले...मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय....

. सीएसएमटीवरून सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस

ठाणे स्थानकात आल्यानंतर गाडीच्या आत असणाऱ्या प्रवाशांनी दरवाजे बंद करून घेतल्यानं स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांचा संताप अनावर झाला...RPFला बोलावूनही गाडीच्या आतील प्रवाशांनी दरवाजा न खोलल्यानं तरुणानं गाडीच्या दरवाजावर हात आपटून आतील प्रवाशांना शिवीगाळ केलीय..त्यामुळे रेल्वेच्या अपुऱ्या नियोजनावर प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केलीय.. आरक्षण करूनही प्रवाशांना असल्या संघर्षांना सामोरं जावं लागतंय.

एकीकडे रेल्वेतील गर्दीमुळे प्रवाशांचा संताप झालेला असताना दुसरीकडे खासगी वाहनांनी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचेही हाल झालेत... पनवेलच्या पळस्पे पुलावर अवजड वाहनांच्या तीन तीन रांगामुळे वाहतुक व्यवस्थेचा चांगलाच बोजवारा उडाला... ज्यामुळे जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या...

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव-इंदापूरजवळही अशीच वाहतुक कोंडी पाहायला मिळाली... दरम्यान चिपळूण शहरानजीक बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाचे अपूर्ण कामामुळे वाहतुकीला याचा चांगलाच फटका बसलाय.. खालापूर परिसरातही अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली... मिसिंग लिंकचा मार्ग तयार झाला असला तरीही वाहतूक कोंडी सुटलेली नाही.

रेल्वे आणि रस्ते वाहतुकीत कोकणवासीयांचे दरवर्षी गणेशोत्वात हाल होत असतात.. यावेळी तरी कोकणवासीयांना वेळेत गावी पोहचता येईल, अशी अपेक्षा होती...मात्र यंदाही विघ्न कायम आहेत...आता गणेशोत्सवाच्या पुढील दिवसांमध्ये कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी निघण्यापूर्वी वाहतूक आणि रेल्वेच्या स्थितीचा आढावा घ्या...अन्यथा ट्रॉफीक कोंडीत अडकावं लागेल, अन्यथा रेल्वेच्या गर्दीत गुदमरावं लागेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com