Heavy Rainfall Saam TV
देश विदेश

Cyclone Alert! धोक्याचा इशारा! २४ तासात चक्रीवादळ धडकणार, IMD चा नवा अलर्ट काय?

Weather Updates in Marathi : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो गुजरातच्या दिशेने वेगाने येतेय, असा इशारा हवामान विभागाने दिलाय.

Namdeo Kumbhar

Weather Updates News Update : बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे, त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हे वादळ उत्तर-उत्तर पश्चिम भागाच्या दिशेने वेगाने येत आहे. पुढील २४ ते ४८ तासात हे वादळ गुजरातच्या सीमेला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या खाडीमध्ये हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे वादळ गुजरात खाडीच्या दिशेने वेगाने येत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागान दिली.

IMD च्या अलर्टनुसार, चक्रीवादळ आज रात्री ओडिशा आणि आंध्र प्रदेशची खाडी पार करेल. ७५ किमी प्रति तास वेगाने हवा वाहत आहे. ३ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ कमकुवत होऊ शकते अन् हवेचा वेग कमी होऊ ५५ किमी प्रति तास इतकी होईल. चक्रीवादळाचा परिणाम पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ पुढील पाच दिवस १२ पेक्षा जास्त राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, बिहार, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज सकाळपासून ओडिशामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा दिलाय. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज रात्री चक्रीवादळ ओडिशाची खाडी पार करून आंध्र प्रदेशमधील गोपालपूरमध्ये धडकेल. ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील समुद्रात अथवा किनाऱ्यावर जाणं टाळावे, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलाय.

कोण कोणत्या राज्यात पावसाचा इशारा -

चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर जोरदार पाऊस पडू शकतो. त्याशिवाय ओडिशामधील काही जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. झारखंड, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले आहे. हे द्वारका अन् गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. त्याशिवाय वातावरणात अडथळा निर्माण झाल्यामुळे उत्तर भारतात ८ ऑक्टोपबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या राज्यांमध्ये विक्रमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Police : प्रसिद्ध कलाकाराच्या हत्येचं षडयंत्र; रोहित गोदारा-गोल्डी बरार गँगच्या २ शुटरला राजधानीतून अटक

Dasara Melava: पाच वर्षाचा बाळ शिवसैनिक शिवतीर्थावर निष्ठा आणि उत्साहाची झळक दाखवतोय|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला पोहोचले

IND vs WI Day-1 Highlights: आधी सिराज अन् बुमराहनं कंबरडं मोडलं, नंतर राहुलनं कुटलं; वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या दिवशी भारताचं पारडं जड

Paneer Curry Recipe : सणासुदीला खास बनवा पनीर करी, चव हॉटेलपेक्षा भारी

SCROLL FOR NEXT