India Rain Update Saam Tv
देश विदेश

India Rain Update: देशात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच, २२ राज्यांना रेड अलर्ट; हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

IMD Alert For India: राजधानी दिल्लीसह २२ राज्यांना हवामान खात्याने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

Priya More

India Weather Update: राजधानी दिल्ली सह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (India Heavy Rainfall) पडत आहे. काही राज्यांमध्ये पावासाने कहर केला असून त्यामुळे पूरपरिस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. याठिकाणीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या राज्यामध्ये सध्या तुफान पाऊस पडत असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अशामध्ये हवामान खात्याने (meteorological department) पुन्हा अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. देशातील दिल्लीसह २२ राज्यांना हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर आणि इतर राज्यांमध्ये पुढील २ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर झारखंड आणि मेघालयात विजांच्या कडकडाटासह हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि तेलंगणा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त दक्षिण भारतातील काही भागांमध्ये हलका तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पूर्व यूपीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान दिल्ली एनसीआरच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब-हरियाणामध्येही अशीच परिस्थिती असेल. पूर्व उत्तर प्रदेशात शुक्रवार ते रविवार या काळात पाऊस पडू शकतो.

३० जुलैपर्यंत पूर्व भारतात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड आणि बिहारच्या अनेक भागात ३० जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव देशातील अनेक राज्यातील शाळा आणि महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

SCROLL FOR NEXT