Cargo Ship Fire: 3000 गाड्या घेऊन जाणाऱ्या जहाजाला लागली आग, इलेक्ट्रिक कार ठरली कारण...

Cargo Ship Fire News: गाड्या घेऊन जाणाऱ्या जहाजाला लागली आग, इलेक्ट्रिक कार ठरली कारण...
Cargo Ship Fire
Cargo Ship FireSaam Tv
Published On

Cargo Ship Fire: अलीकडेच डच किनार्‍यावर 3000 कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे. जर्मनीहून इजिप्तला जाणार्‍या पनामा-नोंदणीकृत 199 मीटरच्या फ्रेममेंटल हायवेला मंगळवारी रात्री आग लागली.

या जहाजाचे वजन सुमारे 18,500 टन आहे, जे कार वाहतूक करण्यासाठी कार्यरत होते. यात 350 मर्सिडीज बेंझ कारचाही समावेश आहे. आतापर्यंत हे जहाज बुडण्याचा धोका कायम आहे. जहाजावर ठेवलेल्या इलेक्ट्रिक कारमुळे ही आग लागली, असं सांगण्यात येत आहे.

Cargo Ship Fire
INS Vikrant News : INS विक्रांतवर नौसेनिकाचा मृतदेह सापडला, तपास सुरु

डच ब्रॉडकास्टर NOS ने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरचे सर्व क्रू मेंबर्स भारतीय आहेत. या जहाजात 23 क्रू मेंबर्स होते, ज्यांना हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने वाचवण्यात आले आहे. यामध्ये एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला असून इतर सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.  (Latest Marathi News)

डच कोस्टगार्डने सांगितले की, आग विझवण्यासाठी बचाव जहाजांनी पाणी ओतले, मात्र जास्त पाणी ओतल्याने जहाज बुडण्याचा धोका वाढला आहे. हे जहाज बुडू नये म्हणून याला दुसऱ्या जहाजाला बांधले जात आहे.

Cargo Ship Fire
Stone Pelting on Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनचं दगडफेकीच्या घटनांमुळे मोठं नुकसान, रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत नुकसानीचा आकडाच सांगितला

आग विझवण्यासाठी काही दिवस लागू शकतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग विझवणे खूप अवघड आहे. याचे कारण जहाजात ठेवलेला माल आहे." आगीचे कारण अद्याप तटरक्षक दलाने स्पष्ट केलेले नाही.

कोस्टगार्डच्या प्रवक्त्याने सांगितले की, "जहाजात 2857 गाड्या आहेत, त्यापैकी 25 इलेक्ट्रिक कार आहेत, ज्यामुळे आग भडकली आहे. अशा प्रकारची आग आटोक्यात आणणे सोपे नाही."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com