Stone Pelting on Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनचं दगडफेकीच्या घटनांमुळे मोठं नुकसान, रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत नुकसानीचा आकडाच सांगितला

Vande Bharat News : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत याबाबत माहिती दिली.
Vande Bharat Express
Vande Bharat Expresssaam tv
Published On

Indian Railway News : वंदे भारत एक्सप्रेस  सुरु झाल्यापासून अनेकदा या ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र या दगडफेकीच्या घटनांमध्ये भारतीय रेल्वेचं मोठं नुकसान झालं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत याबाबत माहिती दिली.

 रेल्वेमंत्र्यांच्या माहितीनुसार, 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वेचे 55.60 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या 151 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहितीही दिली. सुदैवाने या घटनांमध्ये एकाही प्रवाशाला इजा झालेली नाही. यादरम्यान प्रवाशांच्या सामानाची कोणतीही लूट किंवा नुकसान देखील झाले नाही.

Vande Bharat Express
RTO Choice Number: श्रीमंत पुणेकर! वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी खर्च केले लाखो रुपये; '१ लाख ८० हजार किंमतीचा नंबर कोणता?

वंदे भारत ट्रेनच्या सुरक्षेसाठी त्यांच्या मार्गावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी दगडफेकीच्या घटना सर्वाधिक आहेत, तेथे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन साथी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आरपीएफ, जीआरपी आणि जिल्हा पोलिसांची टीम एकत्रितपणे काम करते. याशिवाय लोकांना रेल्वे मालमत्तेची तोडफोड न करण्याचे आवाहनही रेल्वेमंत्र्यांनी केले. (Latest Marathi News)

Vande Bharat Express
PM Modi Pune Tour: अमित शहांनंतर आता PM मोदी पुणे दौऱ्यावर, दगडूशेठ गणपतीचा करणार अभिषेक

वंदे भारत ट्रेनवरील दगडफेकीच्या घटना

  • 14 जुलै 2023 रोजी तिल्डा स्टेशनजवळ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. यात खिडकीच्या काचा फुटल्या होत्या.

  • 11 जुलै 2023 रोजी गोरखपूरहून लखनौकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली.

  • 1 जुलै 2023 रोजी कर्नाटकात धारवाड-बंगळुरू वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती.

  • 12 मार्च 2023 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील फरक्का येथे दगडफेक झाली.

  • 26 फेब्रुवारी 2023 रोजी म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली.

  • 9 जून 2023 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधील गुडूरजवळ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाली.

  • 3 जानेवारी 2023 रोजी हावडाहून न्यू जलपाईगुडीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर किशनगंज येथे दगडफेक करण्यात आली.

  • 2 जानेवारी 2023 या दिवशी बंगालमधील मालदा येथे वंदे भारतावर दगडफेक झाली. कुमारगंज रेल्वे स्थानकाजवळ ही दगडफेक झाली.

  • 14 डिसेंबर 2022 रोजी छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com