अक्षय बादवे
Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पुण्यातील अनेक कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत. (Latest Maharashtra Politics News)
त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी दिल्ली येथून पुणे विमानतळावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचे आगमन होईल.
लोहगाव विमानतळावरून शिवाजीनगर भागात तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganpati Mandir) मंदिरात मोदी जाणार आहेत. पुढे स. प. महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना गौरविण्यात येणार आहे.
त्यानंतर दुपारी शिवाजीनगर येथील कार्यक्रमात विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.