कर्नाटक काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना ईडीकडून अटक
१२ कोटी कॅश, ६ कोटींचं सोनं-चांदी आणि ४ गाड्या जप्त
गंगटोकमध्ये अवैध ऑनलाइन व ऑफलाइन सट्टेबाजी प्रकरण उघड
ईडीकडून सहा राज्यांमध्ये तब्बल ३० ठिकाणी छापे
Illegal betting racket in Gangtok involving Congress MLA : कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालया) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शनिवारी बेड्या ठोकल्या. गंगटोकमध्ये बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली केसी वीरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे. १२ कोटी रूपयांची रोख कॅश आणि ६ कोटी रूपयांच्या किंमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि चार गाड्या ईडीने जप्त केल्या आहेत. KARNATAKA CONGRESS MLA KC VEERENDRA ARRESTED IN ED RAID, CASH & GOLD SEIZED
आमदार केसी वीरेंद्र हे त्यांच्या सहकाऱ्यांसह, सिक्कीममधील गंगटोक येथे गेले होते. त्यांनी कॅसिनोसाठी जमीन भाड्याने घेतल्याचा आरोप आहे. काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना सिक्किममधील कथित अवैध ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजी प्रकरणात अटक केली आहे. शुक्रवारी वीरेंद्र यांना सिकिक्मची राजधानी गंगटोकमधील मजिस्ट्रेटसमोर हजर करत बंगळुरूच्या कोर्टात हजर करण्याची परवानगी मिळवली. ईडीकडून याबाबत अधिक तपास बंगळुरूमध्ये कऱण्यात येत आहे.
कर्नाटकमधील आमदार केसी वीरेंद्र सहकाऱ्यासोबत सिक्कीमधील गंगाटोक कसिनोसाठी जमीन लीजवर घेण्यासाठी गेले होते. केसी वीरेंद्र यांचा भाऊ केसी नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन. राज यांच्या अनेक संपत्तीची अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली आहे. केसी वीरेंद्र यांचे चार सहकारी यात सहभागी होते. दुबईमधून ऑनलाइन गेमिंगचा धंदा संभाळत होते, असे ईडीने सांगितले.
अवैध ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीच्या आरोपाखी शुक्रवारी ईडीने वीरेंद्र, त्यांचा भाऊ आणि अन् साथीदारांच्या विरोधात सहा राज्यात ३० ठिकाणी छापेमारी केली. ईडीने चित्रदुर्गमध्ये सहा, बंगळुरूमध्ये १०, जोधपूरमध्ये ३, मुंबईमध्ये दोन, गोव्यात आठ आणि हुबळीमध्ये एका ठिकाणी छापा मारला. त्यामध्ये पाच प्रमुख कसिनो, पपीज कसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कसिनो प्राइड, ओशन ७ कसिनो, बिग डॅडी कसिनो यांचा समावेश आहे.
चित्रदुर्गमधील आमदार वीरेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्या वेगवेगळ्या नावावर ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग सुरू केले होते. अवैध सट्टेबाजी संकेतस्थळे चालवली जात होती. ईडीच्या तपासात वीरेंद्र आणि त्यांच्या भावाबद्दल धक्कादायक माहिती समोर आले आहे. केसी थिप्पेस्वामी हा दुबईमधून हे गेम ऑपरेट करत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.