आता काँग्रेसचे सदस्यत्व हवे असल्यास शपथ घ्यावी लागणार!
आता काँग्रेसचे सदस्यत्व हवे असल्यास शपथ घ्यावी लागणार! Saam TV
देश विदेश

आता काँग्रेसचे सदस्यत्व हवे असल्यास शपथ घ्यावी लागणार!

साम टिव्ही ब्युरो

संतोष शाळिग्राम (नवी दिल्ली)

नवी दिल्ली: सार्वजनिक मंचावरून पक्षाचेच नेते काँग्रेसवर (Congress) टीका करीत असताना आता काँग्रेसने या प्रकारांना लगाम लावण्यासाठी शपथ घेणे बंधनकारक केले आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा एक गट अर्थात G-23 नेते माध्यमातून पक्षावर उघडपणे टीका करत आहेत आणि पक्षांतर्गत निवडणुकांची मागणी करत असताना संघटनात्मक रचनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे पाऊल टाकले आहे.

पक्ष नेतृत्व ते संघटनात्मक निवडणुकांपर्यंत अनेक मुद्द्यांवर जी -23 गटाने काँग्रेसवर उघडपणे टीका केल्यानंतर पक्षाने कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडे पक्षावर टीका न करण्याची प्रतिज्ञा घेण्याचे बंधन घातले आहे. आता पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेणाऱ्यांना पक्षाच्या धोरणांवर आणि कार्यक्रमांवर सार्वजनिक व्यासपीठांवर कधीही टीका करणार नाही, असे वचन द्यावे लागेल.

काँग्रेसच्या नवीन सदस्यत्व फॉर्ममध्येच ही प्रतिज्ञा टाकण्यात आली आहे. 'मी धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीच्या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी सदस्यत्व घेतो आहे. मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, उघडपणे किंवा कोणत्याही प्रकारे, पक्षाच्या मंचांशिवाय पक्षाच्या स्वीकृत धोरणांवर आणि कार्यक्रमांवर प्रतिकूल टीका करणार नाही,' अशी ही प्रतिज्ञा आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

SCROLL FOR NEXT