Corona JN.1 Variant Saam TV
देश विदेश

Corona New Variant : 'किमान ५ दिवस मास्क वापरा', नववर्ष साजरं करुन आलेल्यांना टास्क फोर्सच्या अध्यक्षांचा सल्ला

Corona JN.1 Variant News : कोरोनाचा रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. रुग्णालयांमध्ये खाटा, औषधे आणि उपचारासाठी डॉक्टरही उपलब्ध आहेत.

प्रविण वाकचौरे

Corona Virus News :

कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंट JN.1च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मात्र योग्य खबरदारी घेतली तर या व्हायरस अजिबात धोका नाही. प्रशासनाकडून काळजी घेण्याच आवाहन केलं जात आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त अनेक जण विविध पर्यटनस्थळी गेले असतील. मात्र तेथून आल्यानंतर कोणीही आजारी किंवा वृद्ध व्यक्तीच्या थेट संपर्कात येऊ नये.

घरातील प्रत्येकाने पुढील ५ दिवस मास्क घालावा. कारण बाहेरून येणाऱ्या लोकांपासून घरात संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. आजारी आणि वृद्धांमध्ये कोरोना व्हायरस अधिक वेगाने पसरू शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवभारत टाईम्सशी बोलताना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.रमण गंगाखेडेकर यांनी याबाबत म्हटलं की, घाबरण्याची गरज नाही. 31 डिसेंबर आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेकजण पर्यटनस्थळी जात आहेत. कोरोनाचा रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. रुग्णालयांमध्ये खाटा, औषधे आणि उपचारासाठी डॉक्टरही उपलब्ध आहेत.  (Latest Marathi News)

किमान ५ दिवस मास्क लावा

देशात आणि राज्यात कोरोना नवा व्हेरिएंट JN.1 झपाट्याने पसरत आहे. वृद्ध आणि आजारी लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना या व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे जे इतर राज्यातून किंवा गर्दीच्या भागातून सुट्टीनंतर परतत आहेत, त्यांनी घरातील वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या थेट संपर्कात येऊ नये. कारण जर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तो इतरांमध्ये देखील पसरू शकतो. त्यामुळे घरी किमान ५ दिवस मास्क लावा, असा आवाहन डॉ. गंगाखेडकर यांनी केलं आहे.

बूस्टर डोस घ्या

कोरोनाच्या जुन्या लस नव्या ओमिक्रॉन व्हायरसचा सामना करण्यासाठी फारशा प्रभावी नाहीत. आता जी लस आली आहे जी ओमिक्रॉनवर देखील प्रभावी आहे. त्यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ते इच्छा असेल तर बूस्टर डोस घेऊ शकतात, असं देखील डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT