Lucknow Airport: लखनौ विमानतळावर सुरु होती तपासणी, प्रवाशाकडील कॉफी मशीन उघडताच अधिकारी थक्क झाले!

Lucknow Airport News: उत्तर प्रदेशमधील चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन जणांकडून तब्बल अडीच कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे हे सोने भारतात आणण्यात आले होते.
Gold
Gold Saam Tv
Published On

Lucknow Aiport Caught 2 For Gold Smuggling :

उत्तर प्रदेशमधील चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन जणांकडून तब्बल अडीच कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे हे सोने भारतात आणण्यात आले होते. कस्टम ड्यूटी टीमने (Custom Duty) हे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, हे सोने दुबई (Dubai) आणि शारजाह येथून आणण्यात आले होते. कॉफी मशीनमध्ये लपवून हे सोने भारतात आणले होते. ३.४९७ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोने एअर इंडियाच्या (Air India) IX-194 विमानातून उत्तर प्रदेशमध्ये आणण्यात आले होते. सामानाची तपासणी करताना कस्टम टीमला दोघांवर संशय आला. त्यानंतर तपासणीसाठी त्यांनी कॉफी मशीन उघडली तर त्यातून दोन सोन्याची बिस्किटे सापडली.

Gold
Happy New Year 2024: नवे वर्ष, नवे पर्व! २०२४ च्या पहिल्या दिवशी 'हे' ८ संकल्प कराच!

यावेळी इंडिगोच्या (Indigo) विमानाने शारजाहून आलेल्या आणखी एका प्रवाशाकडून तब्बल ५५४ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. सोन्याची पेस्ट करुन हे सोने (Gold )भारतात आणण्यात आले होते. ४.०५ किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत २.५५ कोटी आहे.

Gold
Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंजाब आणि बंगालचे शोभारथ का नसणार? संरक्षण मंत्रालयाने सांगितलं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com