Gangappa Pujari
२०२४चा पहिला दिवस. हे वर्ष यशस्वी, आरोग्यदायी अन् भरभराटीचे जाण्यासाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे संकल्प करुन ठेवा...
वाचाल तर वाचालं! नवीन वर्षात भरपूर पुस्तके वाचण्याचा संकल्प करा. विविष विषयांवरील पुस्तके वाचून त्यावर तुमच्या शब्दात अभिप्रायही लिहण्याची सवय लावून घ्या.
आपल्या यश- अपयशात सोबत असलेल्या मित्रांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे नव्या वर्षात भरपूर नवे मित्र जोडा. ओळखी वाढवा...
नववर्षाच्या पहिल्यादिवशीपासून नेहमी सकारात्मक राहण्याचा, अडचणींना, संकटांना न घाबरता मात करण्याचा संकल्प करा.
अर्थातच नवनवीन ठिकाणांना भेटी दिल्याने नव्या गोष्टी, ठिकाणांची माहिती होते. अनेक चांगले वाईट अनुभव येतात. त्यामुळेच नव्या वर्षात खूप नवीन ठिकाणी भेटी देण्याचा संकल्प करा..
आजच्या काळात बहुतेक लोकांचे काम एकाच ठिकाणी बसून असते. अशा वेळी, आपल्या शारीरिक हालचाली खूप कमी झाल्या आहेत. त्यामुळे दररोज किमान अर्धा तास व्यायाम करण्याची सवय लावा.
तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैशांची बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे नवीन वर्ष पैसे वाचवण्याचा संकल्प करा आणि तुमचे काही अनावश्यक खर्च असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
नेहमी फिट, हेल्दी राहण्यासाठी व्यसनांपासून चार हात लांब राहण्याचा संकल्प करा. चांगल्या सवयी लावून घ्या.
जीवनात पुढे जाण्याचा मूळ मंत्र म्हणजे कष्टाबरोबरच शिकत राहणं गरजेचं आहे. या वर्षी, असा संकल्प करा की तुम्ही नक्कीच काहीतरी नवीन कौशल्य शिकाल!