Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Lok Sabha Election 2024: केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास आरक्षणासाठी निर्धारित केलेली 50 टक्क्यांची मर्यादा रद्द केली जाईल: राहुल गांधी

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi On Reservation:

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे आहे. मध्य प्रदेशात एका सभेत राहुल गांधी म्हणाले की, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास आरक्षणासाठी निर्धारित केलेली 50 टक्क्यांची मर्यादा रद्द केली जाईल. ते मध्य प्रदेशातील खरगोन येथे एका निवडणूक सभेत बोलत होते.

काँग्रेस पक्ष निवडणुकीनंतर आरक्षणाची मर्यादा वाढवणार आहे. यातच सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचाराया हवा की, का त्यांचे लोक आरक्षण रद्द करण्याबाबत वक्तव्य करत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं आहे, त्यांना संविधान बदलायचे आहे आणि ते रद्द करायचे आहे. संविधान रद्द केलं तर आदिवासींना मिळालेले सर्व काही नष्ट होईल. भारतावर 22-25 अब्जाधीशांचे राज्य असेल. आदिवासींच्या पाण्यावर, जंगलांवर, जमिनीवर अब्जाधीशांची नजर असते. हे सर्व हिसकावून अब्जाधीशांच्या ताब्यात दिले पाहिजे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अब्जाधीशांचे खास मित्र आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, ते (भाजप) आदिवासींचा अपमान करतात आणि मग तुमची मते मागतात. तुम्ही त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा. काँग्रेसचे सरकार आल्यास 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करून आरक्षणात वाढ करण्यात येईल.

यावेळी गांधींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट महिला, युवक आणि शेतकऱ्यांशी संबंधित योजनांचाही उल्लेख केला. निवडणुकीनंतर केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि मनरेगा योजनेतील दैनंदिन भत्ता 250 रुपयांवरून 400 रुपये करण्यात येईल, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT