मुंबई: विजय वड्डेट्टीवार यांनी कसाबविषयी केलेल्या विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केलीय. काँग्रेसवाल्यांना कसाबच्या अपमानाची चिंता आहे, पण त्याच्या हल्ल्याने मुंबईकारांचा मृत्यू झाला त्यांचं दु:ख काँग्रसवाल्यांना नाहीये, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विजय वड्डेवट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. वडेट्टीवार यांनी केलेलं भाष्य हे दुर्दैवी असून त्यांच्या विधानामुळे शहिदांचा अपमान झालाय. जनता या अपमानाचा बदला घेईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. ते ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी कसाबच्या बंदुकीतून पोलीस अधिकारी करकरे यांचा मृत्यू झाला नसल्याचं विधान केलं होतं. वडेवट्टीवार यांच्या विधानावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्यावर टीका करत आहेत. तर २६/११ मुंबई हल्ल्याचा खटला लढणारे सरकारी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी वडेवट्टीवार याच्यावर टीका केली होती.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापले आहे.आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वडेट्टीवार यांच्या विधानाचा समाचार घेतला. काँग्रेसच्या नेत्यांना कसाबचा अपमान दिसला पण मुंबईकरांचं दु:ख वेदना दिसल्या नाहीत. हा शहिदांचा अपमान आहे. ज्या कसाबने मुंबईवर हल्ला केला तो हल्ला परतून लावण्यासाठी मुंबई पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवानांनी शौर्य गाजवलं. पण हे शौर्य गाजवणाऱ्या शहिदांचा, पोलिसांचा अपमान आहे.
कसाबला जिवंत पकडण्यासाठी पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे यांनी अंगावर गोळ्या घेतल्या. ही देशभक्ती आहे. कसाब संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे शहिदांचा अपमान झाला, अशा देशद्रोही विधाने करणाऱ्या नेत्यांचा बदला जनता घेईल असं मुख्यमंत्री म्हणालेत.
भाजप युवा मोर्चा आक्रमक
विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या निवास्थानाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी काल केली. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले होते. एकच घोषणा द्यायला सुरुवात केली. विजय वडेट्टीवार यांचा पुतळाही जाळण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.