IAS 3rd Marriage Saam Tv
देश विदेश

IAS 3rd Marriage: आयएएस अधिकाऱ्याचे तिसरं लग्न, पहिल्या दोन्ही पत्नी IAS, तर आताची पत्नी आहे मंत्रालयात कामाला

IAS Officer Avi Prasad Third Marriage: आयएएस अधिकारी अवि प्रसाद यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. तिने तिसऱ्यांदा आयएएस अधिकाऱ्यांशी लग्न केले.

Siddhi Hande

IAS अवि प्रसाद यांनी बांधली तिसऱ्यांदा लग्नगाठ

आधीच्या दोन्ही पत्नी होती आयएएस अधिकारी

मध्य प्रदेशमधील लग्नाची सर्वत्र चर्चा

मध्य प्रदेशमधील एका लग्नाची सध्या खूप चर्चा होत आहे. आयएएस अधिकारी अवि प्रसाद यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आयएएस अधिकारी अवि प्रसाद यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांचे याआधीच्या दोन्ही पत्नींसोबत घटस्फोट झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आता तिसऱ्यांदा लग्न केले आहे.

आयएएस अवि प्रसाद यांच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी या आयएएस अधिकारी आहेत. त्यादेखील प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांची तिसरी पत्नी राज्य मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत.

अवि प्रसाद हे नेहमीत आपल्या कामगिरीमुळे चर्चेत असतात. २०१३ मध्ये त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी २०१४ मध्ये १३वी रँक मिळवली. त्यांची निवड आयएएस ऑफिसर म्हणून झाली. ते प्रतिष्ठित आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

अवि प्रसाद हे मूळचे उत्तर प्रदेशमधील सितापुर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्याचे आजोबा हे मंत्री होते. त्यांच्या कुटुंबात लहानपणापासूनच राजकारणाचे किंवा सार्वजनिक जीवनाचे बाळकडू मिळत होते. त्यांनी हे सर्व फार जवळून पाहिले आहेत.

पहिले लग्न

अवि प्रसाद यांचे पहिले लग्न रिजु बाफना यांच्याशी झाले होते. दिल्लीतील सिविल सेवा परीक्षेत तयारीदरम्यान त्यांच्यात प्रेम झाले. रिजु बाफना या सध्या मध्य प्रदेशच्या शाजापुर जिल्ह्यात कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे नाते फार दिवस टिकले नाही. त्यांनी घटस्फोट घेतला.

दुसरे लग्न

पहिले लग्न मोडल्यानंतर अवि प्रसाद यांनी आयएएस अधिकारी मिशा सिंह यांच्याशी लग्न केले. त्या सध्या रतलाम येथे कलेक्टर आहेत. त्यांचेही लग्न फार दिवस टिकले नाही. लग्नानंतर चार वर्षांनी त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला.

तिसरं लग्न

अवि प्रसाद यांनी आता आयएएस अधिकारी अंकिता धाकरे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्या राज्य मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT