Indian Air Force Latest News 
देश विदेश

Plane Crash : हवाई दलाचे विमान कोसळले, ५ जवानांचा मृत्यू, देशावर शोककळा

Indian Air Force Latest News : आसाममधील जोरहाट एअरबेसवर भारतीय वायुसेनेचे एएन-३२ मालवाहू विमान लँडिंगदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात पाच हवाई दल जवानांचा मृत्यू झाला असून एका सहवैमानिकावर उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Air force Aircraft Crash : भारतीय वायुसेनेचे (IAF) 'AN-32' हे मालवाहू (Transport) विमान आसाममधील जोरहाट एअरबेसवर लँडिंग करताना दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्दैवी घटनेत भारतीय हवाई दलाच्या ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाकडून ५ जणांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. सहवैमानिक बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लँडिंगदरम्यान विमानाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. या घटनेनंतर वायुसेनेकडून तातडीने चौकशीचे (Court of Inquiry) आदेश देण्यात आले आहेत.

हवाई दलाचे एएन-३२ हे वाहतूक विमान जोरहाट येथे लँडिंगवेळी दुर्घटनाग्रस्त झाले. लँडिंगवेळी विमानाला अचानक आग लागली. अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओमध्ये वाहतूक विमानाचे दोन तुकडे झाल्याचे दिसत आहे. हवाई दलाची आपत्कालीन प्रतिसाद पथके सध्या घटनास्थळी कार्यरत आहेत. हवाई दलाने अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशी समितीचे आदेशही दिले आहेत.

भारतीय हवाई दलाकडून एक्सवर ५ जवानांच्या मृत्यूबाबत पोस्ट करत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आसाममधील जोरहाट येथे झालेल्या एएन-३२ विमान अपघातात पाच जवानांच्या निधनाने भारतीय हवाई दल अत्यंत दुःखी आहे. स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर एअर खेमाराम कुमावत आणि अग्निवीर एअर दानिश आलम यांनी कर्तव्य बजावत असताना सर्वोच्च बलिदान दिले.

भारतीय हवाई दल शोकाकुल कुटुंबियांप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त करते. या दुःखाच्या प्रसंगी हवाई दल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

आज सकाळी १०:०० वाजता आसाममधील जोरहाट येथे भारतीय हवाई दलाच्या An-32 विमानाचा अपघात झाला. विमान उतरत असताना अपघात झाल्यामुळे हवाई दल तळावर आपत्कालीन प्रतिसाद सुरू करण्यात आला. संरक्षण जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल एम. रावत म्हणाले, "भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान जोरहाट हवाई तळावर उतरताना कोसळले. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली जात आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT