Arvind Kejriwal  Google
देश विदेश

Arvind Kejriwal: 'मी देश वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे', अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात केलं आत्मसमर्पण

Delhi News: दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात आरोपी असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज अटकपूर्व जामिनाची मुद्दत संपल्यानंतर तिहार तुरुंगात जात आत्मसमर्पण केलं आहे.

Satish Kengar

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात आरोपी असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज न्यायालयात शरणागती पत्करली आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्याला ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निवडणूक प्रचारासाठी १ जूनपर्यंत अटकपूर्व जामीन दिला होता आणि १ जूननंतर आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. आत्मसमर्पण करण्याआधी केजरीवाल यांनी आप पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, 'मी देश वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे.'

केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव एका आठवड्याची मुदत मागितली होती. मात्र ट्रायल कोर्टाने या याचिकेवरील निर्णय ५ जूनपर्यंत राखून ठेवला होता. अरविंद केजरीवाल अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर ५५ दिवसांनी १० मे रोजी तिहार तुरुंगातून बाहेर आले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यालयात हजर करण्यात आले. अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करणाऱ्या ईडीच्या अर्जावर दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी केली. ईडीने न्यायालयाला सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना आरोपी बनवण्यात आले आहे, त्यामुळे आम्ही कोठडीची विनंती करत आहोत.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह तिहार तुरुंगात पोहोचले आणि न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. केजरीवाल यांच्या आत्मसमर्पणानंतर सुनीता केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंदखेडराजा तालुज्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; २५ वर्षीय अभिनेत्रीवर सिनेमात काम देण्याचं आमिष देऊन ३ वर्ष अत्याचार केल्याचा आरोप

Nandurbar : बनावट कागदपत्रांचा आधारे मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती; नंदुरबार शिक्षण विभागाचा बोगस कारभार

Navratri 2025: नवरात्रीमध्ये घरी आणा या गोष्टी, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल लाभ

SCROLL FOR NEXT