Priest kills Girlfriend Saam Tv
देश विदेश

Hyderabad Crime: खळबळजनक! 30 वर्षीय तरुणीवर जडलं पुजाऱ्याचा जीव; आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर केलं भयानक कांड

खळबळजनक! 30 वर्षीय तरुणीवर जडलं पुजाऱ्याचा जीव; आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर केलं भयानक कांड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priest kills Girlfriend: मुंबईच्या चर्नी रोड येथे एका तरुणीची हत्या आणि मिरारोडमध्ये लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या तरुणीची पार्टनरकडून हत्या, या दोन्ही घटनांनी संपूर्ण देश हादरुन गेला आहे. अशातच आता आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

एका पुजाऱ्यानं त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पुजाऱ्यानं नंतर प्रेयसीचा मृतदेह मंदिराच्याच मागे पुरला होता. हा भयंकर प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. हत्या करणाऱ्या पुजाऱ्याचं नाव साई कृष्णा असून त्याच्या प्रेयसीचं नाव अप्सरा होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षांचा साई कृष्णा पुजाऱ्याचं काम करत होता. तर ३० वर्षांची अप्सरा एका खासगी कंपनीत कामाला होती. साई कृष्णा पुजाऱ्यासोबत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही काम करायचा, अशीही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्परा साई कृष्णासोबतच सुलतानपल्ली येथील एका गोशाळेत गेली होती. तिथे तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर साई कृष्णाने अप्सराचा मृतदेह मंदिराच्या मागच्या बाजूस पुरला होता. महत्त्वाचं म्हणजे खुद्द साई कृष्णा यानेच पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अप्सराची मिसिंग कल्पेंट दिली होती. पण पोलिसांच्या तपासातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुजाऱ्यानं आपल्याच गर्लफ्रेंडची हत्या का केली? असा नेमका कोणता वाद त्यांच्यामध्ये झाला होता? यासह अनेक प्रश्नही उपस्थित केले जात होते. त्याबाबत ही धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

खरंतर साई कृष्णाचं आधीच लग्न झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. पण अप्सराचा पुजाऱ्यावर जीव जडला होता. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नंतर नंतर अस्परा लग्नासाठी साईकृष्णावर दबाव टाकत होती. त्यातून अखेर वैतागून साई कृष्णाने अप्सराला संपवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण हा धक्कादायक प्रकरा समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

SCROLL FOR NEXT