Hyderabad News Saam Tv
देश विदेश

हैदराबादमध्ये तणाव कायम, दगडफेकीनंतर लाठीचार्ज, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात

आमदार राजा सिंह यांची पोलिसांनी सुटका केल्यानंतर हैदराबादमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

साम वृत्तसंथा

हैदराबाद: तेलंगणामध्ये भाजपचे आमदार राजा सिंह यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर हैदराबादमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार राजा सिंह यांची पोलिसांनी सुटका केल्यानंतर हैदराबादमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसापासून नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू केली आहेत. आणि आमदार राजा सिंह यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. राजा सिंह यांच्याविरोधात घोषणा देत पुतळे जाळले जात आहेत. हे आंदोलन पाहता पोलिसांनी (Police) जुन्या हैदराबाद शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

काल बुधवारपासून शहरात आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू केला. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. शहरातील शालीबंडा परिसरात कालपासून गोंधळ वाढला आहे, पोलिसांनी (Police) अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे, पण तरीही नागरिकांनी विरोध वाढवला आहे. तर आज गुरुवारी पहाटे २ वाजता आंदोलकांनी आमदार राजा सिंह यांच्या अटकेच्या मागणीच्या घोषणा दिल्या सुरू केल्या, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. यानंतर पोलिसांनी गर्दीवर लाठीचार्ज केला.

पोलिसांनी (Police) आंदोलकांना पळवून लावत लाठीचार्ज केला, यात अनेकजण जखमी झाले. पोलिसांनी काही लोकांच्या घराचे दरवाजे तोडून त्यांना मारहाण करून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकांची सुटका केली असल्याचा दावा करण्यात येत आहे.

'ज्यां लोकांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केली, त्यांना शिवीगाळ केली, त्यां लोकांना पोलिसांनी मोठ्या सन्मानाने त्यांच्या वाहनात बसवून घरी सोडले. आणि आमच्यावर लाठीचार्ज केला असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

याआधी भाजप (BJP) आमदार राजा सिंह यांना मंगळवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. यासोबतच पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. एका धर्माविरुद्धच्या त्याच्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेकांनी त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी हैदराबादमध्ये धरणे आंदोलन केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT