Hyderabad News Saam Tv
देश विदेश

Hyderabad Fire | हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाइक शोरूमला भीषण आग, आठ जणांचा मृत्यू

तेलंगणातील सिकंदराबाद येथे इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

साम वृत्तसंथा

हैदराबाद: तेलंगणातील सिकंदराबाद येथे इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला लागलेल्या आगीत (Fire) आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीचे प्रमाण इतके आहे की परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. सिकंदराबाद रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.

शोरूमच्या वरती एक लॉज असून या लॉजमध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

याआधी एप्रिलमध्ये तमिळनाडूमध्ये (Hyderabad) अशीच एक घटना घडली होती. येथील पोरूर-कुंदरातूर शोरूममध्ये एका ग्राहकाने आपल्या ई-बाईकची बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली होती. यानंतर काही वेळातच शोरूममध्ये अचानक आग लागली. हळूहळू संपूर्ण शोरूम आगीत जळून खाक झाले. या घटनेत 5 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 12 जुन्या इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या.

या घटनेवर गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अग्निशमन दलाच्या पथकांनी हॉटेलमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, पण धुरामुळे काही लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. हॉटेलमधून काही जणांची सुटका करण्यात आली आहे. ही घटना कशी घडली याचा तपास करत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सिकंदराबाद रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रुबी हॉटेलमध्ये एकूण २३ खोल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त करत मदतीची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे, शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत, असं ट्विट पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT