Bihar Begusarai Fire Accident  Saam TV
देश विदेश

Fire Accident: साखर झोपेत असताना अनर्थ घडला; नववर्षाच्या दिवशीच अख्खं कुटुंब संपलं, भयानक घटना!

Begusarai Fire News: नववर्षाचं सेलिब्रेशन करून पती-पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह घरात निवांत झोपले. मात्र, रात्रीच्या वेळी घराला अचानक आग लागली.

Satish Daud

Bihar Begusarai Fire Accident

नववर्षाचं सेलिब्रेशन करून पती-पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह घरात निवांत झोपले. मात्र, रात्रीच्या वेळी घराला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केलं. या आगीत चौघांचाही होरपळून मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही घटना बिहारच्या बेगुसरायमध्ये सोमवारी (१ जानेवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नीरज पासवान, कविता देवी, लव (वय ५) आणि कुश (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. आगीच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नीरज पासवान पत्नी कविता आणि दोन चिमुकल्या मुलांसह बेगुसराय जिल्ह्यातील नवतोलिया गावात राहत होते. सोमवारी नीरज यांनी पत्नी आणि दोन मुलांसोबत नववर्षाचं सेलिब्रेशन केलं. रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले.

मात्र, त्याचवेळी अचानक घराला आग लागली. ही आग इतकी भीषण होती, की क्षणार्धात संपूर्ण घराला आगीचा विळखा पडला. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. संपूर्ण पासवान कुटुंबीय आगीत होरळून गेलं.

आगीची माहिती मिळातच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृत कविता देवी ८ महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT