Divorce Saam TV
देश विदेश

Divorce: हनीमूनच्या रात्रीपासून शरीरसंबंधांस नकार, १५ वर्षे नवऱ्यानं बायकोचा नकार पचवला, शेवटी....

Divorce News : पत्नीने तब्बल १५ वर्षं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने अखेर पतीला घटस्फोटाचा आधार घ्यावा लागला. विशेष म्हणजे, न्यायालयाने पत्नीच्या या वागणुकीला ‘मानसिक क्रूरता’ ठरवत घटस्फोट मंजूर केला आहे.

Bhagyashree Kamble

लग्नानंतर प्रत्येक जोडपं आपल्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवतो. मात्र जयपूरमधूनसमोर आलेल्या एका अनोख्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका पतीने पत्नीने १५ वर्षं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने पत्नीच्या वागणुकीला ‘मानसिक क्रूरता’ मानत घटस्फोट मंजूर केला आहे.

वकिल डी एस शेखावत यांनी सांगितले की, तक्रारदार पतीने त्यांच्या अर्जात म्हटलं की, त्यांचे लग्न ३ नोव्हेंबर २००३ साली झाले होते. परंतु, लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. त्याला वाटले की काळानुसार परिस्थिती बदलेल, मात्र १५ वर्षांनंतरही काहीच बदल झाला नाही. पत्नी सातत्याने शारीरिक संबंध टाळत होती. नकार देत होती.

लग्नाच्या काही वर्षानंतर पत्नीने सासरच्या मंडळींसोबत न राहता वेगळे राहण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर दबावही टाकला. मात्र, पतीला त्याच्या आई वडिलांना सोडायचे नव्हते, असे पतीने आपल्या तक्रारीत म्हटलं. पतीने न्यायालयात सांगितले की पत्नी सतत भांडण करत होती आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होती.

सून धमकी देत असल्यामुळे सासरची मंडळी मूग गिळून गप्प राहत होती. सगळं काही सहन करत राहिली. १३ वर्षे सासरी राहिल्यानंतर ती २ वर्षांपूर्वी सासर सोडून वेगळी राहू लागली. त्यानंतर तिने कधीच सासरच्या कोणत्याही सदस्याशी संपर्क साधला नाही. सासरी कधी फिरकलीच नाही.

यामुळे न्यायालयाने आपल्या आदेशात पत्नीला कोणत्याही कारणाशिवाय २ वर्षांपासून जास्त काळ पतीपासून वेगळे राहिल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

न्यायालयात हजर असताना पत्नीनेही तिने शारीरिक संबंध ठेवले नसल्याचं मान्य केलं. तसेच महिलेनं केलेले आरोप सगळे खोटे असल्याचंही सिद्ध झाले आहे. न्यायाधीश पवन कुमार यांच्या अध्यक्षतेखालील कोर्टाने या प्रकरणात पतीला मानसिक क्रूरतेचा बळी मानत घटस्फोट मंजूर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

iPhone 17: आयफोन १७ केवळ २ दिवसांत लाँच होणार, किंमत आणि फीचर्स चर्चेत

Chandra Grahan 2025: आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; तब्बल ८२ मिनिटं दिसणार Blood Moon, जाणून घ्या सुतक काळ

SCROLL FOR NEXT