araga jnanendra saam tv
देश विदेश

Hubli: दगडफेकीत एका निरीक्षकासह ४ जखमी; पुर्व नियाेजीत कट : गृहमंत्री

संपूर्ण शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

साम न्यूज नेटवर्क

कर्नाटक : हुबळी (hubli) येथील जुने हुबळी पोलीस स्टेशनवर (hubli police station) दगडफेकीची घटना रात्रीच्या सुमारस घडली. या घटनेत एका निरीक्षकासह चार पोलिस (police) जखमी (injured) झाले. दरम्यान संपूर्ण शहरात कलम १४४ (section 144) लागू करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती (karnatak) पोलिस आयुक्त लभू राम यांनी दिली. दरम्यान हुबळी येथे शनिवारी रात्री झालेला गोंधळ हा एक पद्धतशीर कट असल्याचे दिसून येत आहे. हे दगड यापूर्वीच जमा करुन ठेवण्यात आले हाेते असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी नमूद केले आहे. (hubli latest marathi news)

हुबली-धारवाडचे पोलिस आयुक्त लाभू राम यांनी एएनआय या वृत्त संस्थेला माहिती देताना सोशल मीडियावर (social media) व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल एका जणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे असे नमूद केले.

त्यानंतर पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. या संदर्भात सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून या हिंसक कारवायात सहभागी ४० जणांना अटक केल्याचेही पोलिस आयुक्त लाभू राम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान जुन्या हुबळी पोलिस स्टेशनवर झालेली दगडफेकीची घटना पूर्वनियोजित कट असल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी माध्यमांशई बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT