Corona News Updates Saam Tv
देश विदेश

Corona JN.1 Variant Update : रुग्णालयांमध्ये जागा मिळणार नाही; कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटबाबत अमेरिकेच्या सीडीसीचा गंभीर इशारा

Corona JN.1 Variant Update : अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने या व्हायरसच्या प्रसाराचा वेग आणि त्याच्याशी संबंधित धोक्यांसंबंधी गंभीर इशाला दिला आहे.

प्रविण वाकचौरे

Corona Virus News :

कोरोना व्हायरसच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. भारतात देखील नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेतही नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने या नव्या व्हायरसच्या प्रसाराचा वेग आणि त्याच्याशी संबंधित धोक्यांसंबंधी गंभीर इशाला दिला आहे. JN.1 कोरोना व्हायरसचा एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार आहे. त्याचा वेगाने होणारा प्रसार यामुळे रुग्णालयात रुग्णांना मोठ्या संख्ये अॅडमिट करावं लागू शकते. (Latest News Update)

सीडीसीने सांगितले की, कोविड रूग्णांच्या हॉस्पिटलायझेशनची संख्या वेगाने वाढत आहे. प्रशासन या परिस्थितीवर देखील लक्ष ठेवून आहे. सीडीसीला भीती आहे की आगामी काळात परिस्थिती कठीण होऊ शकते.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार, देशाच्या काही भागात मुलांची रुग्णालये दाखल होण्याची संख्या वाढली आहे. मागील आठवड्यापेक्षा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट होती. यासोबतच वृद्ध नागरिकांमध्येही कोरोना व्हायरसचे प्रमाण फ्लूपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीडीसीचा अंदाज आहे की JN.1 रुग्णांच्या संख्येतील वाढ सुरूच राहील. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 कोविड-19च्‍या नवीन लाटेचे कारण ठरु शकते. हा व्हेरिएंट BA.2.86 व्हेरियंट सारखाच मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

Kolhapur Tourism : पश्चिम घाटातील निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाण, हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट

Bollywood Actress : साऊथ चित्रपटात काम करणे कठीण; लोकांनी केल्या शरीरावर कमेंट्स, अभिनेत्री गेली होती ट्रॉमामध्ये

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Kalyan Traffic : कल्याण पूर्व-पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल बंद, २० दिवसांसाठी पर्यायी मार्ग, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT