वेस्टर्न केप प्रांतातील राष्ट्रीय महामार्गावर दोन मिनीबसची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातात किमान २१ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
केप टाउनपासून सुमारे ३८० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.
दक्षिण आफ्रिकेतून एका भीषण अपघात घडलाय. रविवारी रात्री वेस्टर्न केप प्रांतातील एका राष्ट्रीय महामार्गावर दोन मिनीबसची समोरासमोर धडक झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात किमान २१ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले.
स्थानिक 'रोड ट्रॅफिक मॅनेजमेंट कॉर्पोरेशन' (RTMC) आणि प्रांतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री ११:३० च्या सुमारास घडला. केप टाउनपासून सुमारे ३८० किलोमीटर अंतरावर असलेल्या 'प्रिन्स अल्बर्ट' आणि 'लीऊ-गामका' दरम्यान ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, दोन मिनीबस टॅक्सींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, मागून येणारे तिसरे वाहनही लगेचच त्यांच्यावर जाऊन आदळले. या धडकेमुळे वाहनांचा चक्काचूर झाला. अख्खा रस्त्यावर वाहनांचे तुकडे विखुरले होते.
स्थानिक प्रसारमाध्यमे आणि 'शिन्हुआ' (Xinhua) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न केप प्रांतातील रहदारीच्या मार्गावर हा अपघात झाला. माहिती मिळताच आपत्कालीन पथके, पोलीस आणि बचावकार्य करणारे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. बचावकार्य आणि तपास प्रक्रियेसाठी प्रशासनाने N1 महामार्ग दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद केला असून, वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली.
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दक्षिण आफ्रिकेत सामान्य जनतेसाठी मिनीबस हे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे, परंतु अतिवेग आणि रस्त्यांची खराब स्थिती यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार चिंतेचा विषय ठरतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.