Fatal Car Crash on Bharatmala Expressway Saam
देश विदेश

दोन आलिशान वाहनांची एकमेकांना टक्कर, बिझनेसमॅन, पत्नी अन् मुलीचा जागीच मृत्यू; ४ जण गंभीर जखमी

Fatal Car Crash on Bharatmala Expressway: भारतमाला एक्स्प्रेस वेवर चुकीच्या बाजूने येणाऱ्या फॉर्च्युनरने कारला दिली धडक. तिघांचा मृत्यू. चार जणांची प्रकृती गंभीर.

Bhagyashree Kamble

  • भारतमाला एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात.

  • दोन वाहनांची एकमेकांना टक्कर.

  • अपघातात तिघांचा मृत्यू.

भारतमाला एक्स्प्रेसवेवरील लाछडी टोल प्लाझाजवळ दोन आलिशान वाहनांचा भीषण अपघात घडला. दोन वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच सांचोर पोलीस आणि रूग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर, मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अरूण (वय वर्ष ३५), पत्नी वंदना (वय वर्ष ३२) आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा (धीयारा) अपघातात मृत्यू झाला. अरूण हा बिझनेसमॅन असून, त्याचा कपड्याचा व्यवसाय होता. तर, त्याच्या वडिलांचा जसोलमध्ये मेडिकल शॉप होता. या भीषण अपघातात अरूणची मुलगी पहल आणि पुतण्या भरत हे अपघातात गंभीर जखमी झाले. तर, आणखी एक महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अरूणचं कुटुंब सकाळी लवकर सुरतच्या दिशेनं निघाले होते. घरापासून १३५ किलोमीटर अंतरावर हा दु्र्देवी अपघात घडला. मार्गावर फॉर्च्युनर आणि किआ वाहनाचा समोरासमोर अपघात घडला. वृत्तानुसार, किआ कारमध्ये पाच जण होते. त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सांचोर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्याच्याकडेला असलेल्या वाहनांना बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शिवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. तर, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या मते, प्राथमिक तपासात अपघाताचे कारण वेग आणि चुकीच्या दिशेनं वाहन चालवणे असल्याचं दिसून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हाता-पायांवर ही लक्षणं दिसली तर हार्ट अटॅक येऊ शकतो; उशीर करणं पडेल महागात

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये तब्बल 80 जणांची बंडखोरी

Yellow Batata Bhaji Recipe: मुलांच्या टिफीनसाठी सुकी बटाटा भाजी कशी बनवायची?

९० दिवस काम करा अन् पेन्शन मिळवा; गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारासांठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Shocking : खांबावर चढून विजेच्या वायरला पकडलं, क्षणात तरुणाचा कोळसा झाला; मध्य प्रदेशच्या कामगाराची नांदेडमध्ये आत्महत्या

SCROLL FOR NEXT