Rajasthan Accident saam tv
देश विदेश

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

Bharatpur road accident thar jeep crash kills couple and two kids : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. भरधाव थार जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. त्यात पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

Nandkumar Joshi

  • राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात भीषण अपघात

  • एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

  • भरधाव थारने दिली दुचाकीला जोरदार धडक

  • मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश

राजस्थान येथील भरतपूर जिल्ह्यात नदबई-जनुथर रस्त्यावर एका भरधाव थार गाडीनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. थारच्या धडकेनंतर दुचाकीला आग लागली. या अपघातानंतर संतापलेल्या जमावानं जीप पेटवून दिली. पोलिसांनी जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तसेच या घटनेचा तपास सुरू केला आहे.

कुम्हेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देहवा गावातील पती-पत्नी आणि दोन मुलं शनिवारी दुचाकीवरून जात होती. त्याचवेळी नदबई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदबई-जनुथर रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला वेगाने येणाऱ्या थार जीपने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीवरून अख्खं कुटुंब मृत्युमुखी पडलं.

मिळालेल्या माहितीनुसार, नटवर सिंह (वय ३२), त्याची पत्नी पूजा देवी (वय २८), मुलगी परी (४ वर्षे) आणि दोन वर्षांचा मुलगा दीपू हे दिवाळीनिमित्त सासरी जात होते. नदबई-जनुथर रस्त्यावर लुहासा गावाजवळ एका भरधाव येणाऱ्या थार गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक भीषण होती. त्यामुळे दुचाकीने पेट घेतला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणली. अपघातग्रस्त कुटुंबातील चौघांनाही नदबई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्या चौघांनाही मृत घोषित केले. या अपघातानंतर स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी थार जीप पेटवून दिली. पोलिसांनी तात्काळ आग नियंत्रणात आणली. पण तोपर्यंत जीप खाक झाली होती.

या घटनेत लुहासा येथील रहिवासी असलेला थार चालक नरेश कुमार हा जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नटवरचं कुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. पोलिसांनी या अपघाताच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT