IAF Wing Commander arrested in an alleged honey trap and espionage case involving sensitive information. saam tv
देश विदेश

Honey Trap: तिच्या बोलण्याला भूलला हवाई दलाचा विंग कमांडर; शत्रू राष्ट्राला सांगितलं देशाचं सीक्रेट

Honey Trap IAF Wing Commander Arrested: भारतीय हवाई दलाच्या एका विंग कमांडरवर हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला देशाची संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. हवाई दलाच्या अंतर्गत तपासानंतर हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आले असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Bharat Jadhav

  • एका विंग कमांडरला कथित हनी ट्रॅप आणि हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली

  • पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला देशाची संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप

  • संशयास्पद हालचाली आणि पुरावे आढळल्यानंतर हवाई दलाने तक्रार केली.

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडरनं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला देशाची सीक्रट माहिती दिली. याप्रकरणी हवाई दलाच्या विंग कमांडरला अटक करण्यात आली आहे. अनेक महिने पाळतीनंतर पुरावे हाती येताच हवाई दलाने तक्रार केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडे हे प्रकरण सोपवण्यापूर्वीच हवाई दलाने अंतर्गत पातळीवर अधिकाऱ्याच्या हालचालीवर लक्ष ठेवलं, त्यात संशयास्पद गोष्टी दिसल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे. ३० मे रोजी अटक झाल्यानंतर दोन महिन्यांनी (दि. ३० जुलै) या अधिकाऱ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या दुजोऱ्यानंतर ही माहिती समोर आलीय.

अधिकाऱ्यावर बारकाईने पाळत ठेवून नंतर त्याला योग्य कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या ताब्यात दिले, असे दिल्लीत हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितलं. हे आता प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं पोलिसांनी निवेदनात म्हटलंय. अधिकाऱ्याकडून कथितरीत्या मिळवलेल्या माहितीचे स्वरूप, व्याप्ती, अतिरिक्त संवेदनशील सामग्री पाठवली गेली का, याचाही तपास सुरू आहे.

असा अडकला हनी ट्रॅपमध्ये

वैयक्तिक अडचणीतून जाणाऱ्या या अधिकाऱ्याशी एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधली. आधी त्याला व्हिडीओ कॉल्स सुरू केले. दोघांची ओळख घट्ट होताच तिने लष्करी तैनाती व हालचालींविषयी माहिती दे, अशी गळ घातली. त्यानंतर अधिकाऱ्याने डिजिटल माध्यमांतून छायाचित्रे, व्हिडीओ व कागदपत्रे तिला पाठू लागला.

लष्कराची माहिती मिळवण्यासाठी अधिकाऱ्याने कथितरित्या एका सहकाऱ्याला मोबाईल फोनवर विशिष्ट अॅप्लिकेशन इन्स्टॉल करायला लावले. त्या अॅप्लिकेशनमध्ये डेटा काढणे, ठिकाणाचा मागोवा घेणे किंवा संवादांमध्ये हस्तक्षेप करणे शक्य असलेल्या स्पायवेअर किंवा रिमोट अॅक्सेसची क्षमता होती. त्यातून त्याने संवेदनशील माहिती मिळवली.

हनी ट्रॅप करणारी महिला पाक गुप्तचर यंत्रणेची एजंट

हवाई दलाच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या महिलेचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर नेटवर्कशी होता, असा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. या ऑपरेशनमागील सूत्रधारांना ओळखण्याचे व इतर संरक्षण कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले गेले होते का, हे निश्चित करण्याचे काम केले जातंय. या अधिकाऱ्याने हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांड अंतर्गत एका 'फिल्ड एअर बेस'वर तैनात होता. या कमांडकडे पश्चिम सीमेवरील हवाई मोहिमांचे नियंत्रण असते. त्यात पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश व राजस्थानातील तळांचा समावेश होतो.

गुप्तचर माहिती देशाबाहेर जात असल्याचा संशय येताच हवाई दलाने चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली गेली. प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडे सोपवण्यापूर्वी कथित हस्तकासोबतचा त्याचा संवाद बारकाईने तपासला गेला. त्याच्यावर 'ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold-Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल, आतापर्यंत चांदी १.८८ लाखांनी स्वस्त,वाचा सोन्याचे दर किती?

Fancy Suit Designs: रक्षाबंधनाला काय घालावं सुचत नाहीये? ट्राय करा हे ५ ट्रेन्डी फॅन्सी सूट डिझाईन्स

GK : सापाच्या विषारी दंशातून वाचवू शकतो घोडा? काय आहे त्यामागचं थक्क करणारं सत्य

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; कोणी चिखल फेकला तर कोणी भिरकावला बूट

Monday Horoscope: नव्या लोकांशी संवाद साधाल, 7 राशींच्या व्यक्तींचा दिवस मनाप्रमाणे जाणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT