राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंना देशात आणखी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असता.. असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय.. भागवतांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि या नव्या विधानानं नवा वाद उफाळणार का पाहूया...
संघामुळे हिंदू सुरक्षित? मोहन भागवतांचं विधान
नव्या विधानावरून नवा वाद?
प्रत्येक हिंदूने सनातन धर्माचे जतन, पालनपोषण आणि संवर्धन केले पाहिजे. आणि त्यांच्या वचनबद्धतेबाबत खंबीर राहिले पाहिजे असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवतांनी उडुपी मठातील गीता मंदिरातून हिंदू धर्मांसाठी संघाच्या योगदानाबाबत भाष्य करत संघ नसता तर हिंदूंना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असल्याचं म्हटलंय...यासाठीच धार्मिक नेते आणि संतांना आध्यात्मिक मूल्ये आणि राष्ट्रीय आदर्शांचं समर्थन करण्यासाठी समाजाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याचं आवाहन भागवतांनी केलं. यावेळी भागवतांना सनातन धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘श्रीकृष्ण गीतानुग्रह पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भागवत काय म्हणाले पाहूया...
मुळात,भगवद्गीतेच्या शिकवणीचा संदर्भ देताना भागवत काय म्हणाले पाहूया....
‘भगवान कृष्णाने अर्जुनाला आव्हानांना सामोरे जाण्याचा, त्यांच्यापासून पळून न जाण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे भगवद्गीता जेव्हा सामान्य जनतेसाठी सुलभ भाषेत सादर केली जाते, तेव्हा ती समाजासाठी मार्गदर्शक शक्ती ठरते. RSS नसते, तर हिंदूंना देशात आणखी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असता.’
भारत हा स्वत:च्या तत्त्वावर आधारलेला असून 'हिंदुत्व' हे भारताचे तत्व असल्याचा उल्लेख संघानं आणि भागवतांनी याआधीही वेळोवेळी केलायं. यातून भागवतांना बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हे हा मोदींनी निवडणुकीत दिलेला नारा अधोरेखित करायचा आहे का असा सवाल उपस्थित होतो..भागवतांनी दिलेल्या गीतेच्या उदाहरणानुसार त्यांचा अर्जुन संघाची गीता ऐकणार का ? आणि धर्मयुद्धात येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना हे लोकशाहीचं राज्य ध्रुवीकरणापासून वाचवणार का हेच पाहायचं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.