Hyderabad Killing Case
Hyderabad Killing Case Saam Tv
देश विदेश

हैद्राबादमध्ये आंतरधर्मीय विवाह: बहिणीच्या नवऱ्याची हत्या! ती म्हणाली, माझ्यासाठी तो मुस्लिम...

वृत्तसंस्था

हैदराबाद: गुरुवारी घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका मुस्लिम तरुणीने दलित तरुणाशी लग्न केलेले तरुणीच्या कुटुंबीयांना अजिबात आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी या तरुणाची गाडीवरून भररस्त्यात अडवून लोखंडी रोडने बेदम मारहाण करत हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी रस्त्यावर असलेल्या लोकांपैकी कुणीही त्यांना वाचवण्यासाठी मदत केली नाही.

'तुम्ही मला का मारत आहात, मला सोडा, जाऊ द्या...' हैदराबादमध्ये रस्त्याच्या मधोमध हत्या करण्यापूर्वी हे नागराजूचे शेवटचे शब्द होते. पण ते त्याला क्रूरपणे मारतच राहीने अन् त्याचा शेवटी मृत्यू झाला... धर्मविरहित विवाहाचा राग एवढा होता की त्याने मित्रांसमवेत आपल्याच बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला.

सैयद आशरीन सुल्ताना (Syed Ashrin Sultana) आणि नागराजू यांच्या प्रेमकहाणीच्या झालेल्या या करुण अंताने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. आता आशरिन सुल्तानाने त्यांच्या प्रेमकहाणीचा अनुभव कथन केलाय. तिने सांगितले, २५ वर्षांचा नागराजू आणि २३ वर्षांची आशरीन सुल्ताना यांनी दोन महिन्यांआधी लग्न केलं होतं. दोघेही एकमेकांना बऱ्याच आधीपासून ओखळायचे. त्यांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. मात्र ही शपथ तुटली. आशरीनच्या भावांनी नागराजूची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम;

नागराजू (वय 25) यांनी तीन महिन्यांपूर्वी 31 जानेवारी रोजी 23 वर्षीय सुलताना (उर्फ पल्लवी) हिच्याशी विवाह केला. या प्रकरणाबाबत नागराजूच्या एका नातेवाईकाने सांगितले आहे की, दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. या दोघांचा दोन महिन्यांपूर्वी जुन्या शहरातील आर्य समाज मंदिरात विवाह झाला. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते, त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी नागराजूची निर्घृण हत्या केली आहे.

'नागराजू धर्म बदलायला तयार होता, पण...';

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुलतानाने दावा केला आहे की, नागराजू तिच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्यास तयार होते, तरीही तिचा भाऊ मोबीन अहमद सहमत नव्हता. त्याने सुलतानाला हे लग्न करण्यास मनाई केली होती, परंतु सुलतानाला ते मान्य नव्हते.

दलित हिंदू नागराजू हे सिकंदराबादमधील मरेडपल्ली येथील रहिवासी होते. जुन्या शहरातील मलकपेठ येथील एका कार शोरूममध्ये तो सेल्समन म्हणून कामाला होता. आता त्यांच्या हत्येप्रकरणी सुलतानाच्या दोन भावांना (सय्यद मोबीन अहमद आणि मोहम्मद मसूद अहमद) अटक करण्यात आली आहे.

पहा व्हिडीओ-

मारेकर्‍यांकडून मी माझ्या पतीच्या जीवाची भीक मागत राहिली;

महिनाभरापूर्वी सुलतानाच्या भावाने नागराजूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना ते दोघे सापडले नाहीत. त्यानंतर 4 मे रोजी आरोपींनी नागराजूचा पाठलाग करून पंजाला अनिल कुमार कॉलनी, सरूरनगर येथील लाल दिव्याजवळ नागराजूला थांबवले. त्यानंतर आरोपींनी नागराजूची लोखंडी रॉड आणि चाकूने हत्या केली. पतीच्या हत्येनंतर सुलतानाने रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. ती म्हणाली, 'मारेकर्‍यांकडून मी माझ्या पतीच्या जीवाची भीक मागत राहिली. पण त्यांनी माझ्या पतीला चाकूने वार केले. माझ्या डोळ्यासमोर माझ्या नवऱ्याचा खून केला.

...दोघांचा जीवही घेऊ शकतात.;

सुलतानाने सांगितले की, लग्नापूर्वी त्यांनी नागराजूला सांगितले होते की, त्यांचे कुटुंबीय या लग्नावर खूश नाहीत आणि ते यामुळे दोघांचा जीवही घेऊ शकतात. सुलतानाच्या म्हणण्यानुसार, यावर राजू म्हणाला होता की, मला कशाचीही पर्वा नाही. त्याला सुलतानासोबत जगायचे आहे आणि तिच्यासोबतच मरायचे आहे.

ही हत्या भररस्त्यात झाली;

त्या भयानक घटनेविषयी सुलताना सांगते की, ती तिच्या पतीसोबत स्कूटीवरून रस्ता ओलांडत होती. तेवढ्यात दुचाकीवरून दोन जण त्यांच्या समोर आले. त्यापैकी एक तिचा भाऊ मोबीन होता. त्यानंतर नागराजूला लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. सुलतानाने सांगितले की, ही हत्या भररस्त्यात झाली. जिथे आजूबाजूला बरेच लोक उपस्थित होते. सर्वजण नुसते पाहत राहिले आणि कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. कोणी पुढे आले असते तर कदाचित राज आज जिवंत राहिला असता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar: १ मे पासून 'या' राशींचं पलटणार नशीब; मेषमधील सूर्य-शुक्राच्या युतीमुळे मिटतील अडचणी

Buldhana News: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या; वऱ्हाडी मंडळींवर चढवला हल्ला, लोक पळतच सुटले

Vegetables Rate Increased In APMC: उष्णता वाढल्यामुळे आवक घटली; भाजीपाला महागला, काय आहेत आजचे दर?

Jalana News: हृदयद्रावक! बोअरवेल सुरू करताना विद्युत केबलने पेट घेतला.. महिलेचा होरपळून मृत्यू; जालना हळहळलं

Maharashtra Lok Sabha 2024: सभेला उत्तर सभेने! महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात; आज पुण्यात जाहीर सभा

SCROLL FOR NEXT