Supreme Court of India Saam TV
देश विदेश

Supreme Court: हिंडेनबर्ग प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पाठवली नोटीस

आज सर्वोच्च न्यायालयात अदानी ग्रृपच्या विरोधात हिंडनबर्गने सादर केलेल्या अहवाला संदर्भात सुनावणी पार पडली.

Shivaji Kale

Hindenburg - Adani : गेल्या काही दिवसांपासून उद्योजक गौतम अडानी यांच्याविरोधात हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या धक्कादायक आरोपांनंतर देशात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला होता. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही लोकसभेत यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. ज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारने या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी केली होती.

याच विषयावर आता सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सर्वोच्च न्यायालयात अदानी ग्रृपच्या विरोधात हिंडनबर्गने सादर केलेल्या अहवाला संदर्भात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सेबीच्या वतीने बाजू मांडणाऱ्या भारताचे महाधीवक्ता तुषार मेहता यांना तुम्ही भारताच्या गुंतवणूकदारांचे रक्षण कसं करणार? असा सवाल उपस्थित केला.

तसेच केंद्र सरकारला या सर्व प्रकरणासंदर्भात सोमवारपर्यंत उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सेबी आणि अर्थ मंत्रालयाला देखील या सर्व प्रकरणाची सादर करण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी न्यायालयाने भारतीय शेअर मार्केटवर कुठलंही भाष्य केलं नाही.

अदानी समुहाविरोधात हिंडनबर्गच्या अहवालाशी संबंधित 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. वकील एम एल शर्मा आणि विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अमेरिका स्थित हिंडेनबर्गने अदानींचे शेअर्स शॉर्ट सेल केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT