Ajit Pawar: मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांची शिंदे- फडणवीस सरकारवर जहरी टीका, म्हणाले; '9 महिन्यात बाळ...'

महाराष्ट्रात गद्दारीच राजकारण झालं, मात्र महाराष्ट्र कधीही गद्दारीचे राजकारण मान्य करत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

Ajit Pawar: राज्याचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तारावून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. सात महिन्यांपासून शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. यावरुन आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे.

तसेच अजित पवार यांनी शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तुत्वान नाहीत का? असा सवाल विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. (Ajit Pawar)

Ajit Pawar
Viral VIdeo: आता काय करावं! माझा नवरा कोण आहे; चिमुरडीने रडून रडून घरं डोक्यावर घेतलं..

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील पाथरीत शेतकरी मेळाव्यास विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, तसेच महिला नेतृत्वावरुनही शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अजित पवार...

"शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तुत्वान नाहीत का?" असा सवाल विचारत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरुनही साधला निशाणा...

"सरकारला सत्ते येऊन सात महिने झाले, मात्र अजून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, नऊ महिन्यात तर बाळ जन्माला येते यांना मात्र साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही" असे म्हणत अजित पवारांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही सडकून टीका केली आहे.

Ajit Pawar
Cow Hug Day: काऊ हग डे’ वरून केंद्र सरकारची माघार; निर्णय घेतला मागे

गद्दार निवडून येणार नाहीत..

यावेळी बोलताना अजित पवारांनी शिवसेना पक्षातील बंडखोरी करणाऱ्या आमदारांवरही जहरी टीका केली आहे. "महाराष्ट्रात गद्दारीच राजकारण झालं,मात्र महाराष्ट्र कधीही गद्दारीचे राजकारण मान्य करत नाही , 1992 साली शिवसेनेचे 19 आमदार फुटले पण नंतर एकही आमदार निवडणुकीत विजयी झाला नाही, पुढे राणे यांच्या नेतृत्वाखाली देखील शिवसेना फुटली; आमदार फुटले, तेव्हा देखील स्वतः राणे निवडून आले नाहीत," अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com