Cow Hug Day: काऊ हग डे’ वरून केंद्र सरकारची माघार; निर्णय घेतला मागे

सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका करण्यात आली. याच कारणामुळे केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला आहे.
Cow Hug Day
Cow Hug DaySaam Tv
Published On

Cow Hug Day: 'व्हॅलेंटाईन डे' संपूर्ण जगात १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मात्र केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. तसे पत्रदेखील या विभागाच्या वतीने काढण्यात आले होते.

मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने केली आहे. (Valentine Day)

Cow Hug Day
Gokul Milk Rate : गोकुळच्या दूध दरात पुन्हा वाढ; किती रुपयांनी महागलं दूध? जाणून घ्या नवे दर

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. तसे निर्देश देणारे एक परिपत्रकही काढण्यात आले होते.

मात्र सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका करण्यात आली. याच कारणामुळे केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय वन्यजीव संरक्षण महामंडळाने तसे निर्देश दिले आहेत

Cow Hug Day
Shivjayanti 2023: आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा; राज्य सरकार सहआयोजक होणार

बोर्डाचे सचिव एसके दत्ता यांनी नव्या निवेदनात सक्षम प्राधिकारी आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारतीय पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी गाय आलिंगन दिन साजरा करण्यासाठी जारी केलेले अपील मागे घेण्यात आल्याचे सांगितले आहे.

काय होता निर्णय...

जागतिक प्रेमदिन म्हणून १४ फेब्रुवारी हा सर्वांना चांगला ठाऊक आहे. हा दिवस संपूर्ण जगात आणि भारतातही साजरा केला जातो. मात्र, भारतात प्रेमदिनाला कायमच विरोध होतो. हा विरोध आता सरकारच्या पातळीवरदेखील होत आहे.

त्याचे कारण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी एक पत्र काढून १४ फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिल्याचे या परिपत्रकात सांगितले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com