Gokul Milk Rate : गोकुळच्या दूध दरात पुन्हा वाढ; किती रुपयांनी महागलं दूध? जाणून घ्या नवे दर

आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
Gokul Milk Rate Hike
Gokul Milk Rate Hike Saam Tv
Published On

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Gokul Milk Rate Hike : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. एकीकडे महागाई सतत वाढत असताना आता दूध दरातही वाढ झाली आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाने विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उद्यापासून कोल्हापूर, मुंबई आणि पुणे शहरात दुध विक्रीत होणार वाढ होणार आहे.

गोकुळने गायीच्या दुधामध्ये प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ केली आहे. तर म्हशीच्या दुधामागे प्रतिलीटर तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सध्या गाईचं दूध ५४ रुपये दराने मिळत होतं. उद्यापासून हेच दूध ५८ रुपये प्रतिलीटर दराने मिळणार आहे. (Latest Marathi News)

Gokul Milk Rate Hike
Viral Video : आधी खाल्ला मार, नंतर घेतला खतरनाक बदला; तरुणाला गाढवाने दिली भयानक शिक्षा

विशेष बाब म्हणजे, गेल्या महिन्यातही गोकुळने गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात (Milk Price) वाढ केली होती. आता या महिन्यातही अचानक दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराचा फटका बसणार आहे. दुसरीकडे, दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा काहीसा फायदा होणार आहे.

मुंबईत सध्या गोकुळच्या म्हैस दुधाचा दर प्रतिलिटर ६९ रुपये इतका आहे. उद्यापासून हेच दुध ७२ रुपये दराने खरेदी करणार आहे. दुसरीकडे गायीचे दूध ५४ रुपये प्रतिलीटर इतक्या दराने मिळत होते. उद्यापासून गायीचे दूध ५६ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे.

Gokul Milk Rate Hike
BBC Documentary : बीबीसीवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; हिंदू सेनेची याचिका फेटाळली

पुण्यात गोकुळच्या दूध दरात वाढ

पुण्यात सध्या गोकुळचे म्हशीचे दूध प्रतिलिटर ७० रुपये दराने मिळत आहे. उद्यापासून ते ७२ रुपये दराने मिळणार आहे. त्याचबरोब गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रुपये मिळत होते. आता गायीच्या दुधाचा दर ५६ रुपये प्रतिलिटर इतका होणार आहे.

पुणे, मुंबई बरोबर कोल्हापुरातही गोकुळच्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे. कोल्हापुरात म्हशीच्या दुधाचा दर ६४ रुपये प्रतिलीटर इतका होता. उद्यापासून म्हशीचे दूध ६६ रुपये दराने खरेदी करावे लागणार आहे. दुसरीकडे गायीचे दूध ४८ रुपये दराने मिळत होते. आता ते ५० रुपये दराने मिळणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com