himachal pradesh wedding accident news social media
देश विदेश

लग्नात डान्स सुरू असताना छत कोसळलं; वर बसल्या होत्या ३० महिला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

himachal pradesh wedding accident news : हिमाचल प्रदेशातील चंबा येथील चुराहमध्ये लग्नसोहळ्यात नाचगाणं सुरू असताना अचानक छत कोसळलं. छतावर जवळपास ३० महिला होत्या. त्या सर्व ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

Chamba Marriage Accident Viral Video : लग्नाचा माहोल. सगळी एकत्र जमलेली. नाच-गाणं सुरू होतं. महिला, लहान मुलांसह अबालवृद्ध सगळेच हे आनंदाचे क्षण डोळ्यांत साठवून ठेवत होते. नाच-गाणं बघण्यात गुंग असतानाच अचानक घराचं छत कोसळलं आणि आनंदाचे क्षण दुःखात बुडाले. या छतावर ३० महिला बसल्या होत्या. त्या सर्व जणी ढिगाऱ्याखाली दबल्या. डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावात किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील चुराह विभागातील जुंगरा पंचायतीच्या शहवा गावात ही दुर्घटना घडली. लग्नसोहळ्यात नाचगाणं सुरू असतानाच घराचं छत कोसळलं. या छतावर जवळपास ३० महिला बसल्या होत्या. छत कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्याखाली या सर्वजणी दबल्या. जवळपास २९ महिला या दुर्घटनेत जखमी झाल्या आहेत.

या दुर्घटनेनंतर लग्नसोहळ्यात गोंधळ उडाला. आनंदावर विरजण पडलं. सगळेच दुःखात बुडाले. स्थानिकांनी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केलं. त्यानंतर स्थानिक प्रशासनातील अधिकारी-कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. जखमी महिलांना तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. दुर्घटनाग्रस्त घर मातीपासून तयार केलं होतं. लग्नसोहळ्यातील नाचगाणं बघण्यासाठी या घराच्या छतावर मोठी गर्दी जमली होती. क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्यानं भार वाढला आणि छत कोसळलं, असं स्थानिकांनी सांगितलं.

गंभीर जखमी महिलांना चंबा रुग्णालयात पाठवलं

या दुर्घटनेत २९ महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना तीसाच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्वांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तर त्यातील तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना चंबाच्या मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmers Protest: शेतकरी आंदोलनात हिंसाचार उसळला; दगडफेकीनंतर १८ वाहनांना पेटवलं, अख्या शहरात इंटरनेट बंद, हनुमानगडमध्ये का पेटलं?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, २१०० रुपये...

How To Check Original Jaggery: बाजारात मिळणारा ओरिजनल गूळ कसा ओळखायचा?

Maharashtra Live News Update: मेट्रो 2A व 7 सेवा सकाळी 6 ऐवजी 7 वाजता सुरू होणार

गोमांस खाणाऱ्यांसोबत अमित शाहांचं जेवण, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत 'तो' फोटो दाखवला|VIDEO

SCROLL FOR NEXT